- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
navratri-celebration-akola-city: अकोला शहरात नवरात्र उत्सवाला आरंभ: देवी मंदिर आणि घरोघरी घटस्थापना, सार्वजनिक मंडळांत देवी मूर्तीची स्थापना,रास गरबाला सुरवात
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: आदिशक्तीच्या आगमनाच्या निमित्ताने अकोला शहरातील देवीची मंदिरे विद्युतरोषणाईने उजळली आहेत. तोरण, पताके आणि आकर्षक फुलांच्या सजावटीने मंदिरांना वेगळेच रूप प्राप्त झाले असून, गुरूवारी उत्साह आणि भक्तिपूर्ण वातावरणात नवरात्र उत्सवाला आरंभ झाला असून, बीएन्यूज देवी मंदिर आणि घरोघरी घटस्थापना करण्यात आली आहे. तर सार्वजनिक मंडळांच्या ठिकाणी देवी मूर्तीची विधिवत पुजा करुन स्थापना करण्यात आली.
आदिशक्तीच्या आगमनासाठी प्रत्येकजण सज्ज होते. सकाळी मंदिरांमध्ये विधिवत आणि पारंपरिक पद्धतीने घटस्थापना करण्यात आली. बिएन्यूज घरोघरीही विधिवत पद्धतीने घटस्थापना झाली. नवरात्र उत्सवानिमित्त शहरात चैतन्याची, उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त मंदिरात अभिषेक झाल्यावर घटस्थापना करण्यात आली. त्यानंतर महाआरती करुन धार्मिक विधी करण्यात आले. संपुर्ण उत्सवात दिवसभर भजन कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित केले असून नवरात्र उत्सव काळात मंदिरे दर्शनासाठी दिवसभर खुली राहणार आहेत.
काही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी सुरक्षिततेसाठी मंदिरांमध्ये स्वयंसेवक तैनात केले असून, सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आले आहेत. भाविकांची दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता पोलीस विभाग लक्ष ठेवून आहेत.
मंडळांच्या नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण करुन शहरातील सर्व नवरात्र उत्सव मंडळांकडून मान्यवरांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. सायंकाळ नंतर बहुतांश मंडळांनी देवी स्थापन केली. विवीध मंडळांनी उत्सव कालावधीत दिवसभर धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहेत. तर काही मंडळांनी आकर्षक धार्मिक, सामजिक देखावे साकारले आहेत.( नवरात्री 2024)
शहरातील विवीध भागातील नगर, वसाहतीत सकाळी घटस्थापना करुन विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. घरोघरी पारंपरिक पेहरावात महिला युवतीनी घटस्थापना केली. नवरात्र उत्सवानिमित्त उत्साहाचा रंग सगळीकडे पसरला असून प्रत्येकजण आनंदाने, हर्षोल्हासाने आदिशक्तीचे स्वागत करीत आहेत.
घट स्थापना दिनी घरोघरी पंचपक्वान्नही बनविण्यात आले. घटस्थापनेसाठी लागणारे नैवैद्याचे पदार्थ घरोघरी तयार करण्यात आले. तर अनेक भाविकांनी नऊ दिवस उपवास धरला असुन काहींनी नऊ दिवसासाठी पादत्राणाचा त्याग केला आहे. तर काहींनी मौन व्रत धारण केले आहे.
जुने शहरात गर्दी; वाहतुकीस अडथळा
भारतीय अलंकार न्यूज 24
जुने शहरतील गुलजारपुरा, कुंभार वाडा तसेच जयहिंद चौक येथे भव्य देवी मूर्तीची खरेदी विक्री होत असते. सार्वजनिक मंडळांचे कार्यकर्ते देवी मुर्ती घेण्यास या भागात येत असल्याने या ठिकाणी सकाळ पासून गर्दी होती. सायंकाळ नंतर गर्दीत अधिक भर पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता.
रास गरबाला सुरवात
भारतीय अलंकार न्यूज 24
श्री.गुजराती समाज गरबा उत्सव समिती अकोला येथील रास गरबाला आज सायंकाळी सुरवात झाली. यावेळी जगदंबा मातेची आरती करून या गरबा उत्सवाला सुरवात झाली.
यावेळी खा.अनुप धोत्रे, आ.रणधीर सावरकर, जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे, महानगर अध्यक्ष जयंत मसने, विजय अग्रवाल,कृष्णा शर्मा, देवाशिष काकड, संदीप गावंडे, पवन महल्ले आदी पदाधिकारी व गुजराती समाज गरबा महोत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा