murtijapur-constituency-bjp-akl :मुर्तिजापूर मतदार संघात भाजपातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; विद्यमान आमदार विरोधात पक्षश्रेष्ठींकडे निवेदन





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : ऐन निवडणुकीच्या तोंडावर अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर मतदार संघातील भारतीय जनता पक्षामधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असून, भाजपचे विद्यमान आमदार हरिष पिंपळे यांच्या विरोधात आता भाजपाचाच एक गट उघडपणे उभा ठाकला आहे. हरिष पिंपळे यांना उमेदवारी देवू नये, या मागणीसाठी मुर्तिजापूर विधानसभा मतदार संघातील शेकडो आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्रित येवून भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडे आज एक निवेदन सादर केले आहे. या निवेदनाचे वाचनही यावेळी करण्यात आले.


   file photo 



विद्यमान आमदार हरिष पिंपळे यांना परत उमेदवारी न देता पक्ष नेतृत्वाने येथे नवा उमेदवार द्यावा, जेणे करून येथे आपला उमेदवार निवडून आणणे सुकर होईल, असं या निवेदनात म्हटलं आहे. 



हरिष पिंपळे यांच्या एंकदरीत कार्यपध्दतीमुळे, त्यांच्या अर्वाच्च बोलण्यामुळे, उर्मट वागण्याने मतदार संघातील कार्यकर्त्याची आणि मतदारांची त्यांच्याबद्दल प्रचंड नाराजी असल्याचंही या पत्रात नमूद केलं असल्याचे माजी तालुका अध्यक्ष अक्षय लहाने आणि गौतम जगताप यांनी सांगितलं.


यावेळी उपस्थित आजी माजी पदाधिकऱ्यांनी "मग्रूर चेहऱ्याची गेली हवा, आम्हाला पाहिजे आमदार नवा" असा नारा दिला.

टिप्पण्या