- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
murtijapur-assembly-election: चर्चेतील उमेदवार: एका आठवड्यात तीन पक्षाची वारी…रवि राठी यांची किमया न्यारी…
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
ॲड. नीलिमा शिंगणे जगड
अकोला: मूर्तिजापूर मतदार संघातील प्रहारचे उमेदवार रवि राठी सध्या अकोला जिल्ह्यात चर्चेतील उमेदवार ठरले आहेत. एक दोन नव्हेतर चक्क एका आठवड्यात तीन राजकिय पक्षाची वारी करुन आपले हित साधत रवि राठी यांनी किमया केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने तिकिट कापल्या नंतर राठी यांनी भाजपमध्ये नशीब आजमावले. भाजप वरिष्ठ नेत्यांचे उंबरठे झिजविले. मात्र येथेही डाळ शिजली नाही. शेवटी ‘जिसका कोई नही उसका तो…’ अश्या दोन पक्षा पैकी एकाची निवड करुन राठी हे भाऊंच्या दारी गेले. शेवटी येथे बात जमली. अन् रवि राठी यांनी अखेर आपला नामांकन अर्ज मुर्तिजापूर मतदार संघातून दाखल केला.
निवडणुकीच्या तोंडावर शेत मजुरांसाठी झटणारे…शेतकऱ्यांचा कैवारी असे म्हणविणारे रवि राठी यांचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने तिकीट नाकारल्याने आठवडाभर आधी त्यांनी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत नागपूर येथे भाजपात प्रवेश घेतला. त्यांना उमेदवारी देण्यात येणार, असे आश्वासनही देण्यात आले होते. तिकिट मिळेपर्यंत नागपूर येथेच तळ ठोकून बसण्याचा निर्धार राठी यांनी केला होता. मात्र भाजपने ऐनवेळी विद्यमान आमदार हरिष पिंपळे यांना तिकीट जाहीर केल्याने पुन्हा रवी राठी ' बॅक फूट ' वर फेकले गेले.
त्यानंतर नाराज रवि राठी यांनी तत्काळ भाजपला सोडचिठ्ठी देत प्रहार जनशक्ती मध्ये प्रवेश केला. पक्षाचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांची मनधरणी करुन होकार मिळाविलेले रवी राठी यांनी प्रहार कडून मुर्तिजापूर मतदार संघात उमेदवारी अर्ज दाखल केला.
रवि राठी यांना मुर्तिजापूर मतदार संघातील मतदार स्वीकारतात की नाकारतात, हे निवडणूक निकालात स्पष्ट होणारच आहे. परंतू, यासर्व घडामोडीत रवी राठी हे अकोला जिल्हयात चर्चेचा विषय ठरले आहेत. एका आठवड्यात तीन पक्षाची वारी केलेले उमेदवार म्हणून त्यांना नवी ओळख मिळाली आहे, एवढे मात्र निश्चित.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा