भारतीय अलंकार न्यूज 24
ॲड. नीलिमा शिंगणे जगड
अकोला: महात्मा गांधीजींनी स्वातंत्र्याच्या आंदोलनात चरख्यावर सूतकताई करण्याचा संदेश दिला होता. चरखा हा गतीशील जीवनाचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन प्रल्हादराव नेमाडे यांनी केले.
अकोला जिल्हा सर्वोदय मंडळाचे वतीने महात्मा गांधी जयंती निमित्त गांधी जवाहर बागेत आयोजित सुतकताई यज्ञ व सर्वधर्म प्रार्थना समारोप प्रसंगी बोलत होते.सर्वोदय मंडळाचे जिल्हाध्यक्ष बबनराव कानकिरड कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
चरख्याने जीवन जगण्याची कला शिकवली. शेतात तयार होणाऱ्या कापसापासून चरख्यावर सुतकताई करून कापड बनवण्याचा आपला संकल्प आज रोजी तडीस गेला आहे. लवकरात उरळ येथे कापूस ते कापड प्रकल्प कार्यान्वित होत असल्याची माहिती प्रल्हादराव नेमाडे यांनी दिली.
महात्मा गांधीजींच्या विचाराचा कृतिशील संदेश समाजात पेरण्यासाठी आजचा सूतकताई यज्ञ असल्याचे प्रतिपादन सर्वोदय मंडळाचे जिल्हाध्यक्ष बबनराव कानकिरड यांनी केले.
ज्येष्ठ सर्वोदयी महादेवराव भुईभार, प्राचार्य डॉ.रामेश्वर भिसे, जिल्हा सहकार बोर्डाचे अध्यक्ष डाॅ.विवेक हिवरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
सकाळी आठ वाजता महात्मा गांधींजींच्या पुतळ्यास अभिवादन करून सुतकताई यज्ञास प्रारंभ झाला. मध्यप्रदेश सरकारचे माजी मंत्री कमलेश्वर पटेल, काँग्रेस नेते डॉ. अभय पाटील, कामगार नेते प्रदीप वखारीया ,डॉ. वानखडे यांनी सूतकताई यज्ञास भेट दिली.
ज्येष्ठ सर्वोदयी शंकरराव सखाराम सरप वाडेगाव व मानव उर्फ दिलीप शोभराज साधवानी यांचा सर्वोदय प्रचारासाठी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सर्वोदय मंडळाचे वतीने सन्मान करण्यात आला.
ज्येष्ठ सर्वोदयी श्रीकृष्ण विखे, रामचंद्र राऊत, महेश आढे, साहेबराव तायडे, वासुदेव काळमेघ ,वसंत केदार, अनुराग मिश्र, शामराव वाहुरवाघ, मोहम्मद साबीर, सरदार खान, डाॅ. गुरुचरण ठाकूर, ॲड. विलास वखरे, विजय कौसल, सुमित्रा निखाडे, सुनील अवचार, प्रा. संजय तिडके, प्रा. प्रवीण वाघमारे, डॉ. काशिनाथ दाते, डॉ. गोवर्धन खवले, रामदास सरप, उत्तरा सरप, संजय सरप, देविदास नेमाडे ,आकाश इंगळे, रोहित तारकस ,संजय मालोकार, ॲड. सुरेश ढाकोलकर , रविकांत हुरपडे, प्रमोद रत्नपारखी, राजेंद्र सोनवणे, विशाल मांडवे, जगन्नाथ बडे, पुंडलिक भामोदे ,अरुण गवई, मधुकर इंगोले, विनायक कावरे ,डॉ. हेमंत कांबे, शेखर कावरे, बाबाराव खेडकर, शेखर वाकोडे, अतुल अमानकर, नफीस जिलानी यांचे सह शेकडे सर्वोदयी कार्यकर्त्यांनी सुतकताई यज्ञात सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे संचालन सर्वोदय मंडळाचे सचिव डॉ. मिलिंद निवाणे यांनी केले. सर्वधर्म प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा