- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: जिल्ह्यातील राजकारण आज गाजणार ते म्हणजे नाराज इच्छुक आणि बंडखोर उमेदवारांच्या नामांकन अर्ज दाखल करण्याने. उमेदवारी न मिळाल्याने नाराज इच्छुक उमेदवार आज नामांकन अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आपलं नामांकन अर्ज दाखल करणार आहे. यामध्ये सर्वाधिक संख्या महायुतीच्या उमेदवारांची आहे. काल पर्यंत मोठी ताकद नसलेल्या तिसरी आघाडीला नाराज इच्छुकांमुळे आता बळ आला आहे.
बच्चुभाऊ कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षातर्फे अकोला पश्चिमचे इच्छुक उमेदवार डॉ.अशोक ओळंबे, मुर्तीजापुर मतदारसंघातून भाजपचे नाराज उमेदवार रवी राठी, राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अ.प ) बाळापुर मतदारसंघातून जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे आपले नामांकन अर्ज आज भरणार आहेत.
अकोला पश्चिम मधून भाजपचे पाच वेळा नगरसेवक राहिलेले इच्छुक उमेदवार हरीश अलीमचंदानी सुद्धा अपक्ष उमेदवारी भरणार आहेत. त्याचप्रमाणे महाविकास आघाडीच्या शिवसेना ठाकरे गटात नुकतंच प्रवेश घेतलेले रामप्रभू तराळे देखील अकोट मतदार संघ शिवसेना ठाकरे गटाला न सुटल्याने अपक्ष उमेदवारी दाखल करणार असून महाविकास आघाडीची डोकेदुखी येथे वाढविणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा