- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
file image
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: शिवणी येथील रहिवासी असलेले सय्यद मोहसीन सय्यद आसिफ याला आपल्या पत्नीची हत्या केल्याने व यासाठी त्याला मदत करणारी त्याची आई म्हणजेच मृतकाची सासू या दोघांनाही आज अकोला न्यायालयाने आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक - 2 एस. सी. जाधव यांनी आज 22 ऑक्टोबर रोजी आरोपी सैयद मोहसीन सैयद आसीफ ( वय 33 वर्षे) आणि आरोपी रईसाबी सैयद आसीफ ( वय 50 वर्षे) (दोघे रा. सैयदपुरा शिवनी ता. व जि. अकोला) यांना सैयद मोहसीन याची पत्नी व रईसाबी हिची सुन रिज़वाना परवीन हिचा खुन केल्या प्रकरणी सय्यद मोहसीन याला भा.दं.वि. कलम 302 अंतर्गत दोषी ठरवुन आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच आरोपी रईसाबी हिस सय्यद मोहसीन याला खुनाचा गुन्हा करण्याकरीता प्रवृत्त केल्याबद्दल आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे.
घटनेची हकीकत अशी की, 7 मे 2015 रोजी पाहटे तीन वाजताचे दरम्यान पिडीत महिलेचा पती म्हणजे आरोपी सय्यद मोहसीन याने तिचे चारीत्र्यावर संशय घेवून वाद घातला. तिच्या अंगावर घासलेट टाकले. त्यावेळी आरोपी क्रमांक 2 सासु रईसाबी तेथे हजर होती. तिने आपल्या मुलगा मोहसीन याला पिडीतेस जाळून टाकण्याकरीता प्रवृत्त केले. त्यानुसार आरोपी मोहसिन याने पिडीतेस पेटवून दिले. त्यानंतर पिडीतेस जळालेल्या अवस्थेत सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे दाखल करण्यात आले. रुग्णालयात तहसिलदारांमार्फत पिडीतेचे मृत्युपुर्व बयान नोंदविण्यात आले. त्यावरुन आरोपींविरुध्द सिव्हील लाईन पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला. उपचारादरम्यान पिडीत जखमी महिलेचा मृत्यु झाला. प्रकरणाचा तपास ए.पी.आय. संजय कोरचे यांनी करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
या प्रकरणामध्ये सरकार पक्षाने गुन्हा सिध्द होण्याकरीता एकुण सात साक्षीदार तपासले. सरकार पक्षाचा पुरावा ग्राहय मानुन न्यायालयाने आरोपी क्रमांक 1 मोहसिन याला भा.दं. वि. कलम 302 अंतर्गत दोषी ठरवुन आजिवन कारावास व रुपये पाच हजार दंड अशी शिक्षा सुनावली. तसेच आरोपी क्रमांक 2 रईसाबी हिस सुध्दा आरोपी क्रमांक 1 याला खुनाचा गुन्हा करण्यासाठी प्रवृत्त केल्याबद्दल आजीवन कारावास व रूपये 3000 दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे.
या प्रकरणात अतिरिक्त सरकारी वकील आशिष फुंडकर यांनी सरकार पक्षाची बाजु मांडली. तसेच हेड. कॉनस्टेबल श्रीकांत गावंडे, पो. स्टे सिव्हील लाईन व सी.एम.एस. सेल चे पो.हे.कॉ. संतोष उंबरकर यांनी प्रकरणात सहकार्य केले.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा