inauguration-replica-statue- birsa-munda-dhonda-akhar: विकासाच्या प्रवाहात येणे हा आदिवासींचा अधिकार- गोपीकिशन बाजोरीया; धोंडा आखर येथे बिरसा मुंडांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण






भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला:  या देशाच्या सांस्कृतिक वारसाचे खरे जतन आदिवासी बांधवांनीच केले असून पर्यावरण संवर्धनामध्ये सुध्दा आदिवासींचा सिंहाचा वाटा राहीला आहे. देशाच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये सुध्दा या लढवय्या आदिवासींचा सहभाग राहीलेला आहे. तरी सुध्दा आज या समाजाला विकासाची पाहीजे तशी जोड मिळाली नाही. तसेच आदिवासींना योग्य तो न्याय मिळाला नाही त्यामुळे या समाजाला विकासाच्या प्रक्रियेमध्ये जोडणे हे अत्यंत आवश्यक असून विकासाच्या प्रवाहात येणे हा आदिवासींचा अधिकार आहे. असे प्रतिपादन शिवसेना उपनेते तथा संपर्क नेते गोपीकिशन बाजोरीया यांनी केले. ते धोंडा आखर या ठिकाणी आयोजित क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या पुतळा अनावरण व आदिवासी मेळावा तसेच नवरात्री उत्सवाच्या पर्वावर आयोजित दांडीया स्पर्धेच्या कार्यक्रमात बोलत होते. 



पुढे गोपीकिशन बाजोरीया यांनी सांगितले की, विधान परिषदेमध्ये आमदार असतांना गावकर्‍यांशी संपर्क नव्हता, परंतू प्रत्यक्ष संपर्क साधतांना त्यांना पदोपदी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते, त्यांना अन्न, वस्त्र, निवारा या दैनंदिन गरजेसाठी सरकारी यंत्रणेशी प्रचंड संघर्ष करावा लागतो हे निदर्शनात आल्यामुळेच सामाजिक भावनेने व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार यापुढे कार्यरत राहुन जनसामान्य व्यक्तींचे जीवन सुकर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. 


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भिलीचे सरपंच संजय भिलावेकर तर प्रमुख अतिथी म्हणून आ. विप्लव बाजोरीया, जिल्हा प्रमुख अश्विन नवले, युवासेना राज्य पदाधिकारी विठ्ठल सरप, डॉ. दीपक केळकर, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख गोपाल नागपुरे, अ‍ॅड. अग्रवाल, पंकज देशमुख, गोपाल म्हैसने, रमेश थुकेकर, अतुल येळणे, चेतन थामेद, विनायक सुरत्ने, बादल अहिर, अमोल ढोकणे, शशी तराळे, भाऊराव पोफळे, राजेंद्र पुंडकर, प्रविण डिक्कर, अर्जुन इंगळे, संजय गवते, लक्ष्मीबाई सारीसे, यश बाजोरीया, भूमि फाऊंडेशनच्या चंचल पितांबरवाले आदिंची उपस्थिती होती. 


कार्यक्रमाचे आयोजन दिनेश मावसे यांच्यासह चंदु बेठे, करण मावसे, नंदलाल बेठे, अनिल मावसे, निलेश तोता, मिथुन गवते, नंदकिशोर बेठे, उमेश मावसे, श्रावण दहीकर, शिवा गवते, किशोर दहिकर, राजपाल तोता, सुरेश मावसे, पंकज दहिकर, विशाल बेठे, प्रकाश बेठे, निलेश मावसे, गणेश तोता, विश्वास दही, संजय दहीकर, मारोती मावसे, मनीलाल तोता, निवृत्ती तोता यांच्यासह धोंडा आखर वासीयांनी केले होते. 




अभिवचन नेले पुर्णत्वास

सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या आदिवासी गावांना भेटी दिल्यानंतर येथील आदिवासी बांधव मुलभूत सुविधांपासून वंचित असल्याचे शिवसेना संपर्क नेते गोपीकिशन बाजोरीया यांच्या निदर्शनास आले. एक आदिवासी बांधव वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्यानंतरही त्याच्या कुटूंबियांकडे लोकप्रतिनिधींसह प्रशासनाने पाठ फिरविल्याचे दिसून आले. यावेळी आपादग्रस्त कुटूंबियांना तत्काळ आर्थिक तसेच जीवनावश्यक वस्तुंची मदत करण्यासह बाजोरीया यांनी आदिवासी बांधवांच्या उत्थानाचा विडा उचलला, व्याघ्र प्रकल्पामुळे विस्थापीत झालेल्या आदिवासी बांधवांना किमान हजार चौरस फुट जागेसह इलेक्ट्रीक, पाणी, घरकुल आदि सुविधा पुरविल्या संदर्भात त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठपुरावा केला. लवकरच विस्थापीत आदिवासी बांधवांना त्यांची हक्काची घरे मिळण्याचा मार्ग सुकर झाला.विधान परिषदेत तब्बल १८ वर्षे आमदार राहील्यानंतरही त्यांचा थेट जनतेशी संबंध आला नाही. आज रोजी मात्र आदिवासींच्या समस्या पाहून आपण अशा जनतेची सेवा करण्यास मुकलो अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. 

पुढे ग्राम धोंडा आखर येथे लाडक्या आदिवासी बहिणींसोबत हजारो साड्यांचे वाटप करुन रक्षाबंधन उत्सव साजरा केला. यावेळी आदिवासी समाजाचे आराध्य भगवान बिरसा मुंडा यांचा कुठेच पुतळा नसल्याची बाब गावकर्‍यांनी  बाजोरीया यांच्या निदर्शनास आणुन दिली असता नवरात्र उत्सवाच्या पर्वावर भव्य पुर्णाकृती बिरसा मुंडा यांचा पुतळा ग्राम धोंडा आखर येथे स्थापन करण्याची ग्वाही बाजोरीया यांनी आदिवासी बांधवांना दिली. ४ ऑक्टोबर रोजी भव्य पुतळ्याचे बाजोरीया यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. त्यामुळे मा. आ. गोपीकिशन बाजोरीया यांनी आपले अभिवचन  पुर्णत्वास नेल्याचे सांगत हजारो आदिवासी बांधवांनी त्यांचे आभार व्यक्त करीत बाजोरीया यांच्या पाठिशी उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला. 


बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे लोकार्पण


क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होताच हजारो आदिवासी बांधवांनी ‘जय जोहार जय बिरसा’, ‘एक तिर एक कमान’, ‘आदिवासी एक समान’ या नार्‍याने परिसर दणाणुन सोडला होता. यावेळी आदिवासी बांधवांच्या चेहर्‍यावर प्रचंड आनंद दिसून आला. 




दांडीया स्पर्धेचे आयोजन


क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या लोकार्पण प्रसंगी तसेच नवरात्री उत्सवाच्या पर्वावर भव्य दांडीया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत पंचक्रोशीतील अनेक संघांनी सहभाग नोंदविला. हल्ली गरबा, दांडीयाने पाश्चिमात्य नृत्याने परावर्तीत स्वरुप प्राप्त केले आहे. परंतू या ठिकाणी आदिवासी बांधवांनी सादर केलेल्या दांडीयामध्ये मात्र देशातील मुळ सांस्कृतिक वारशाची झलक या ठिकाणी दिसत होती. व खरा सांस्कृतिक वारसा बघायला मिळाल्याने उपस्थित प्रेक्षकांना हा क्षण सुखावून गेला. आपल्या पारंपारीक वेशामध्ये सादर केलेल्या दांडीयाने उपस्थित हजारो प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. या स्पर्धेला बघण्यासाठी परिसरातीलच नव्हे तर इतर जिल्ह्यातील जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता.

टिप्पण्या