- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
harish-pimple-candidacy-mtz : अखेर हरीश पिंपळे यांना उमेदवारी जाहीर; मूर्तिजापूर मतदार संघाचा तिढा सुटला
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: भाजपने अकोला जिल्ह्यातील चार पैकी अकोला पूर्व ,अकोला पश्चिम आणि अकोटच्या जागेवरील आपल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली होती. मात्र एकमात्र मुर्तिजापूर मतदारसंघातील आपल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा गुलदस्त्यात ठेवण्यात आल्याने मतदारांमध्ये उत्सुकता वाढली होती. आज या मतदार संघाकरिता विद्यमान आमदार हरीश पिंपळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याने या जागेचा तिढा सुटला आणि उधाण आलेल्या चर्चांना विराम मिळाला.
आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुका 2024 साठी भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने आज 25 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. यामध्ये विद्यमान आमदार हरीश पिंपळे यांना स्थान मिळाले आहे.
मुर्तीजापुर आणि अकोट या दोन विधानसभा क्षेत्रातील विद्यमान भाजप आमदारांना पहिल्या यादीत स्थान मिळालेले नव्हते. त्यामुळे अकोटचे भाजपचे आमदार प्रकाश भारसाकळे आणि मुर्तीजापुरचे भाजपचे आमदार हरिष पिंपळे यांना वेटिंग वर का ठेवण्यात आलं ? तर यांचा पत्ता तर कट होणार नाही ना याबाबत जोरदार चर्चां रंगली होती. प्रकाश भारसाकळे यांनी देखील त्यानंतरच्या यादीमध्ये स्थान मिळवले. मात्र हरीश पिंपळे यांच्या नावावर महायुतीत एकमत होत नसल्याने मूर्तीजापुर मतदार संघाचा तिढा कायम होता. मात्र आज अधिकृत घोषणा झाल्याने हा तिढा आता सुटला आहे.
दोन तीन दिवसांआधी शरद पवार गटाचे नेते रवी राठी यांनी भाजप मध्ये प्रवेश केल्याने भाजपचे विद्यमान आमदार हरिष पिंपळे यांचे तिकीट कटणार असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. तिकीटसाठी रवी राठी नागपूर येथे तळ ठोकून बसले होते. तर इकडे हरिष पिंपळे यांचे समर्थक पिपळेंना तिकीट देण्यात यावं याकरिता भाजप नेत्यांना साकडे घालत होते. पक्षाने हरिष पिंपळे यांना उमेदवारी न दिल्यास भाजपा पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्याची तयारी ठेवली होती. याठिकाणी वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीने आपल्या उमेदवाराची घोषणा केली होती, नामांकन अर्ज भरण्याची शेवटच्या तारखेला केवळ दोन दिवस शिल्लक राहिल्याने भाजपचा मुर्तिजापूरचा उमेदवार कोण ? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. रवि राठी की हरीश पिंपळे की आणखी तिसरा कोणी अशी जोरदार चर्चा मुर्तीजापुर मतदार संघात सुरू होती. मात्र हरीश पिंपळे यांची या मतदारसंघावर असलेली पकड आणि अनुभव संपन्नता या जोरावर अखेर हरीश पिंपळे यांनी उमेदवारी मिळवली.
मूर्तिजापूर मतदार संघातील नागरिकांनी आजपर्यंत माझ्यावर विश्वास ठेवून मला प्रचंड बहुमताने निवडून दिले. महायुती सरकारने अनेक विकासाची कामे मुर्तीजापुर मतदार संघासाठी केले. माझ्या कार्यकाळात मी अनेक योजना मूर्तिजापूर मतदारसंघासाठी खेचून आणल्या. यासमोर देखील मतदारांचा विश्वास कायम राखणार, अशी ग्वाही आमदार हरीश पिंपळे यांनी दिली.
अशी आहे यादी
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा