- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
garba-dhoom-navratri-akola: अकोल्यात नवरात्रीत गरबाची धूम:श्री अकोला गुजराती नवरात्री उत्सव तर्फे महिलांसाठी गरबाचे आयोजन; संस्कृती व परंपरा जोपासत केले जाते लोकनृत्य
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
ॲड. नीलिमा शिंगणे जगड
अकोला : शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात असून, नवरात्रीत देवीची आराधना नृत्याद्वारा करण्याची बऱ्याच राज्यात परंपरा आहे. विशेषतः गुजरात मध्ये नऊ दिवस गरबा आणि दांडिया खेळला जातो. या लोकनृत्य द्वारा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. महाराष्ट्रातही या लोकनृत्याची परंपरा आता रुजत आहे.
गरबा आणि दांडिया या पारंपारिक लोकनृत्याचा उगम गुजरातमधून झाला आहे. मात्र देवीचे भक्त देशभरात आहेत, त्यामुळे नवरात्रीच्या काळात देशभरात सामुहिक नृत्याचे आयोजन केले जाते. अकोल्यातही नवरात्रीत गरबाची धूम सुरू आहे. शहरात 12 मुख्य ठिकाणी गरबाचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले आहे. येथे स्त्री आणि पुरुषांना गरबा खेळण्यास प्रवेश दिला जातो. मात्र शहरातील मेहरबानो कॉलेज येथे श्री अकोला गुजराती नवरात्री उत्सव तर्फे आयोजित गरबा उत्सवात फक्त महिलांनाच प्रवेश दिला जातो, हे विशेष.
याठिकाणी अगदी 4 वर्षांपासून तर 75 वर्षांपर्यंतच्या महिलांनी गरबात सहभाग घेतात. परंपरा आणि संस्कृतीचे जतन करीत येथे फक्त पारंपरिक गीतांवर महिला थिरकताना दिसतात. विशेष म्हणजे पारंपरिक वेशभूषा करूनच येथे गरबा खेळल्या जातो.
महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून येथे फक्त महिलांसाठी गरबा उत्सवाचे आयोजन केले जाते. याठिकाणी सीसीटिव्ही सुद्धा लावण्यात आले आहेत. गरबा सोबतच विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन येथे केल्या जाते.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा