- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
farmer-movement-wetdrought: अकोला जिल्हा तात्काळ "ओला दुष्काळ" जाहीर करावा; शेतकऱ्याचे अनोखे समाधी आंदोलन
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : वर्ष 2024 च्या जून , जुलै ऑगस्ट आणि सप्टेबर महिन्यात अकोला जिल्हासह बाळापुर आणि तेल्हारा तालुक्यात संततधार पाऊस झाल्यामुळे सोयाबीन , कपाशी पिकांसह अन्य पिकांच मोठ्या प्रमाणात नुकसान झाल होतं. आर्थिक मदत शेतकऱ्यांना अद्यापही मराठी असल्याचा आरोप बाळापुर तालुक्यातील जोगलखेड येथे गोपाल पोहरे या शेतकऱ्याने करीत, अकोला जिल्हा तात्काळ "ओला दुष्काळ" जाहीर करावा, या प्रमुख मागणीसाठी स्वतःला जमिनीत गाडून घेत समाधी आंदोलन केलं आहे.
अकोला जिल्हा तात्काळ "ओला दुष्काळ" जाहीर करावा, शेतकऱ्यांना कुठलेही नियम निकष न लावता सरसकट कर्जमाफी करण्यात यावी, 100% पिक विम्याचा लाभ तात्काळ कुठलेही नियम निकष न लावता देण्यात यावा, 2020 मध्ये मंजूर झालेला खरीप हंगामाचा बाळापूर तालुक्यातील 18 हजार शेतकऱ्यांचा पिक विमा तात्काळ देण्यात यावा, मागील वर्षीचा रब्बी हंगामाचा पिक विमा कंपनीला देण्यास बाध्य करावे, या प्रमुख मागण्यासाठी हे समाधी आंदोलन पुकारलं.यावेळी स्वतःला जमिनीत गाडून घेतलं, असे आंदोलनकर्ता शेतकरी गोपाल पोहरे यांनी सांगितले.
आंदोलनस्थळी ठाणेदार गोपाल ढोले यांच्यासह खान मेजर, गुरू मेजर, बचे मेजर, मोरे मेजर, इंगोले मेजर यांच्यासह तगडा पोलीस बंदोबस्त होता, यावेळी महसूल कडून बाळापूर तहसीलदार वैभव फरताडे, तलाठी प्रफुल्ल गोमसे, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय काळे, मंडळ अधिकारी शिवाजी जाधव उपस्थित होते.
दरम्यान, जिल्हाधिकारी अकोला यांच्यासोबत मागण्याबाबत तातडीची बैठक लावण्यात आली, असे तहसीलदार यांनी आश्वस्त केल्यामुळे सकाळ पासून सुरू झालेले आजचे समाधी आंदोलन दुपारी स्थगित करण्यात आले, असे आंदोलनकर्त्यानी सांगितले.
जोगलखेड
तेल्हारा तालुका
बाळापूर
समाधी आंदोलन
Akola District
Farmer
jogal khed
unique movement
Wet Drought
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा