- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
cases-of-theft-in-akola-district: किराणा बाजारातून व्यापाऱ्याची चार लाखांची बॅग लंपास करणाऱ्या आरोपीस पिंपरी चिंचवड येथुन अटक
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
ठळक मुद्दे
किराणा मार्केट येथून ०४ लाख रूपयाची बॅग लिफ्टींग करणाऱ्या अटल चोरट्यास, पिंपरी चिंचवड पुणे येथून स्थानीक गुन्हे शाखाने केले जेरबंद.
अकोला जिल्हयातील चोरीचे ०४ गुन्हे उघडकीस २,४०,००० रूपयेचा मुद्देमाल हस्तगत.
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: नॅशनल हायवे लाेणी राेडवरील नवीन किराणा बाजार मधून एका चारचाकी वाहनाला अडकवलेली चार लाखांची बॅग दाेन अज्ञात चाेरट्यांनी सिने स्टाइल लंपास केल्याची घटना १२ फेब्रुवारी २०२४ राेजी घडली हाेती.
याप्रकरणी जुने शहर पाेलीस ठाण्यात अज्ञात चाेरट्यांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलिस निरीक्षक शंकर शेळके यांच्याकडे साेपविल्यानंतर आठ महिन्यानंतर 'एलसीबी'च्या चमुने सराइत गुन्हेगाराला पिंपरी चिंचवड येथून शिताफीने अटक केली.
आकाश उर्फ बंटी भवरसिंग राजपुत (३२ रा. विद्या नगर, झोपडपट्टी आयशा मस्जीद मागे चिंचवड, पुणे)असे अटक करण्यात आलेल्या सराइत व कुख्यात आराेपीचे नाव आहे. राष्ट्रीय महामार्गालगतच्या नवीन किराणा मार्केटमध्ये १२ फेब्रुवारी राेजी फिर्यादी शुभम संजय बेहरे किराणा साहित्य खरेदीसाठी आले हाेते. त्यांच्याकडील चार लाख रूपयांची बॅग टाटा एस गाडीला मागील बाजूने अडकवलेली होती. त्यावेळी एका पांढऱ्या रंगाच्या दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी बॅग घेऊन पळ काढला. या प्रकरणी जुने शहर पोलिसांनी अज्ञात दोन चोरट्यांविरूध्द भादंविच्या कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला हाेता.
अकोला शहरात जानेवारी ते फेब्रुवारी या कालावधीत रामदास पेठ, सिव्हील लाईन, सिटी कोतवाली व जुने शहर पाेलिस स्टेशनच्या हद्दीत चार ठिकाणी बॅग लंपास व चाेरीच्या घटना घडल्या हाेत्या. गुन्हेगारांची कार्यशैली लक्षात घेता जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी 'एलसीबी'प्रमुख शंकर शेळके यांना तपास करण्याचे निर्देश दिले. तपासाअंती आकाश उर्फ बंटी भवरसिंग राजपुत हा सराइत गुन्हेगार असून ताे बॅग लंपास करण्यात पटाइत असल्याचे निष्पन्न झाले.
तपास पथकातील पीएसआय गोपाल जाधव, माजीद पठाण, अंमलदार अब्दुल माजीद, वसीमोद्दीन शेख, रविंद्र खंडारे, अविनाश पाचपोर, भास्कर धोत्रे यांना काही महिन्यांपूर्वीच आराेपीचा सुगावा लागला हाेता. परंतु आराेपी राजपूत हा पुणे जिल्ह्यातूनही तडीपार असल्याने त्याचा नेमका ठावठिकाण सापडत नव्हता. अखेर आठ महिन्यानंतर त्याला राहत्या घरुन शिताफीने अटक करण्यात आली. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीसह २ लाख ४० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याचे इतर दाेन साथीदार फरार असून त्यांचा शाेध घेतला जात आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिनांक १२/०२/२४ रोजी फिर्यादी शुभम संजय बेहरे वय २८ वर्ष रा. ग्राम घुसर ता+जि. अकोला यांनी रिपोर्ट दिला होता की, ते त्यांचे किराणा दुकाणाचे सामन खरेदी करण्याकरीता नवीन किराणा मार्केट जुने शहर अकोला या ठिकाणी त्यांची टाटा एस गाडी घेवून गेले असता, गाडी मध्ये किराणा सामान भरत असता त्यांचे ४,००,०००/-रू ने भरलेली बॅग गाडीचे डावे बाजुला लटकवलेली होती. ती पैश्याने भरलेली बॅग ही दोन अनोळखी ईसमांनी माझी पैश्याने भरलेली बॅग काढून गाडीवर माझे समोर पळून घेवून गेले. अश्या रिपोर्ट वरून पो. स्टे जुने शहर अकोला येथे गुन्हा कमांक १२४/२४ कलम ३७९ भा.दं. वि चा गुन्हा नोंद असून तपासावर आहे. आरोपी अज्ञात असल्याने पोलीस अधीक्षक अकोला बच्चन सिंह यांनी पो.नि शंकर शेळके स्थानीक गुन्हे शाखा अकोला यांना सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सुचना दिल्या, त्या अनुषंगाने पो. नि श्री. शंकर शेळके यांनी एक पथक गठीत करून त्यांना वेळोवेळी गुन्हा उघडकीस आणण्या करीता योग्य मार्गदर्शन करून पथकाने तांत्रिक विश्लेषन तसेच गोपनिय माहीतीच्या आधारे अकोला शहरात बॅग लिफ्ट करणारा आरोपीचा शोध तसेच माहीती घेतली असता सदर गुन्हा हा अट्टल गुन्हेगार आकाश उर्फ बंटी भवरसिंग राजपुत रा. विद्या नगर, झोपडपट्टी आयशा मस्जीद मागे चिंचवड पुणे याने त्याचे साथीदारासह केल्या बाबत माहीती प्राप्त झाली. यावरून स्थानीक गुन्हे शाखा अकोला येथील पथकास आरोपी हा त्याचे राहते घरी असल्याबाबत गोपनिय माहीती प्राप्त झाली असता, पो.नि शंकर शेळके यांनी त्यांचे अधिनीस्त पथक पुणे येथे रवाना केले. पथकाने आरोपीस त्याचे राहते घरून आरोपीस ताब्यात घेतले. आरोपीने अकोला शहरातील बॅग लिफ्टींग तसेच पोलीस स्टेशन रामदास पेठ, सिव्हील लाईन, आणि सिटी कोतवाली या ठिकाणी सुध्दा सिगारेट चोरीचे गुन्हे त्याचे ईतर ०२ साथीदारासह केल्याची कबुली दिली. पो. स्टे रामदास पेठ अकोला येथे अप नं अप नं २७५/२०२३ कलम ३७९ भादंवि, पो. स्टे सिव्हील लाईन येथे अप नं अप नं ३६७/२०२३ कलम ३७९ भादंवि, पो. स्टे सिटी कोतवाली येथे अप. नं अप नं १८८/२०२३ कलम ३७९ भादंवि प्रमाणे गुन्हे नोंद आहेत. अटक आरोपी पासून गुन्हयात वापरलेले वाहन तसेच नगदी असा एकुण २,४०,०००/-रू मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीस पुढील तपास कामी पोलीस स्टेशन जुने शहर यांचे ताब्यात देण्यात येत आहे.
ही कारवाई ही पोलीस अधीक्षक अकोला बच्चन सिंह, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, पो.नि शंकर शेळके स्थागुशा अकोला यांचे मार्गदर्शनात सपोनि. विजय चव्हाण, पोउपनि. गोपाल जाधव, माजीद पठाण, पो. अमंलदार अब्दुल माजीद, वसीमोद्दीन शेख, रविंद्र खंडारे, महेंद्र मलिये अविनाश पाचपोर, भास्कर धोत्रे, अमोल दिपके, चाालक, अक्षय बोबडे यांनी केली आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा