career-counselor-neeta-bidve शिक्षणक्षेत्रातील नवदुर्गा: ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणेसाठी धडपडणाऱ्या करिअर काउंसेलर नीता बिडवे





भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: शिक्षण क्षेत्रात आपल्या गुणवत्तेच्या बळावर विद्यादानाचे कार्य करून उत्कृष्ठ नागरिक घडविणाऱ्या महिला शिक्षिका नवदुर्गेचेच एक रूप असतं. मागील 22 वर्षापासून जिल्हा परिषदेच्या शाळेतून सेवा करणाऱ्या शिक्षिका नीता किशोर बिडवे जाधव या शिक्षणातील शारदा सरस्वती नवदुर्गा ठरल्या आहेत. विद्यार्थ्यांना सरस्वतीच्या वाणीने शिक्षण देत करिअर मार्गदर्शन सुध्दा नीता बिडवे करतात. आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करीत त्यांनी आजपर्यंत अनेक पुरस्कारांवर आपले नाव कोरले आहे.



जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, अकोला येथे व्यवसाय मार्गदर्शक व जिल्हा समुपदेशक म्हणून आपला ठसा उमटविणाऱ्या नीता बिडवे (नीता जाधव) या जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा मोरगाव भाकरे, जिल्हा अकोला येथे कार्यरत असून शिक्षण क्षेत्रात 22 वर्षांपासून सेवारत आहेत.

व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन विभाग, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे द्वारा शालेय शिक्षणक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी आयोजित भविष्यातील शैक्षणिक तथा करिअर संधी विषयावरील वेबिनार मालिकेमध्ये विविध अतिशय महत्वपूर्ण विषयावर आपल्या सादरीकरणाद्वारे समुपदेशक म्हणून निता किशोर बिडवे (जाधव) प्रकाश टाकतात. 


 



नीता बिडवे  यांनी एम ए इंग्रजी, इतिहास व मानसशास्त्र या विषयांमध्ये केले आहे. बी एड, तसेच शालेय व्यवस्थापन पदविका,स्वयंसहायता बचत गट पदविका ,सीपीसीटी कोर्स पूर्ण केला आहे.इयत्ता 10 वी 12 वी नंतर करियर च्या संधी, किशोरवयीन मुलांच्या मुलींच्या समस्या व शंका समाधान, परीक्षेला सामोरे जाताना, योग्य करिअरची निवड कशी कराल, विद्यार्थ्यांचे मानसिक सक्षमीकरण, ताणतणावाचे  वेळेचे  व्यवस्थापन आदी विषयावर व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन कार्यशाळा, शाळाभेटी, परिषद, शिक्षक पालक  विद्यार्थी भेटी, चर्चाचे माध्यमातून  त्या प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहेत.


जिल्हास्तरीय व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन कक्षाचे माध्यमातून नीता  बिडवे यांनी अकोला जिल्ह्यातील सातही तालुक्यामधून आजवर एकूण 120 माध्यमिक शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांना ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने समुपदेशन केले आहे.




किशोरवयीन विद्यार्थी विद्यार्थिनी त्यांचे शिक्षक, मुख्याध्यापक पालकांसह गावातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या सहयोगातून ग्रामीण विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रशंसनीय कार्य त्या करीत आहेत. महाकरीअर पोर्टलचे माध्यमातून शिक्षण आणि भविष्यातील अनेकानेक संधींची  जाणीव जागृतीसाठी अतिशय महत्वाकांक्षी प्रचार प्रसारासाठी त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले आहेत. वाचन, गायन, सांस्कृतिक कार्यक्रमातील सक्रिय सहभाग नीता बिडवे यांच्यातील कालागुण प्रदर्शित करतो. 



कोविड महामारीच्या काळातील विशेष उपक्रमामध्ये व्यावसायिक विषय तज्ञाचा सहभागातून व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन करीत नीता बिडवे  यांनी विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढविण्याचे कार्य पार पाडले.जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत “किशोरवयीन मुलांचे मनस्वास्थ” कार्यशाळा,कोरोना महामारीच्या काळात विद्यार्थी शिक्षक पालक यांचे मानसिक सक्षमीकरण – राज्यस्तरीय वेबिनार मध्ये  “Hope For Better Tomorrow” या विषयावर विशेष सत्र आयोजित केले.


अकोला जिल्हा महाकरीअर पोर्टल सर्वाधिक विद्यार्थी log in साठी राज्यस्तरीय द्वितीय स्थानी नेत सध्या करिअर टॉक तालुकास्तरीय कार्यशाळा आयोजन करण्यात येत आहे.


राज्यस्तरीय शिक्षकांसाठी ब्लेंडेड ऑनलाइन घटक संच निर्मिती विषय व्यावसायिक मार्गदर्शन व समुपदेशन या विषयासाठी मॉडेल निर्मितीमध्ये सहभाग. जिल्हा नियोजन व विकास समिती अकोलाद्वारा आयोजित कृषी उद्योजकता व कौशल्य विकास प्रशिक्षणामध्ये सहभागी अकोला जिल्ह्यातील 3100 हुनही अधिक तरुण तरुणींना stress management, करियर निवड व Goal setting वर मार्गदर्शन करीत  त्यांनी आपले विभागाला एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे.



प्रसारमाध्यमातून राज्यस्तरीय प्रादेशिक जिल्हास्तरावर (मराठी/हिंदी/इंग्रजी) बातम्या सर्वदूर प्रसिद्ध होत असून आकाशवाणी इलेक्ट्रॉनिक मिडियाचे माध्यमातून संदेश प्रसारण सुद्धा वेळोवेळी करण्यात येत आहे.समाज माध्यमांच्या प्रभावी वापरातून नीता बिडवे या आपली उद्दिष्टपूर्ती साध्य करीत असून जिल्ह्यातील किशोर वयीन विद्यार्थी विद्यार्थिनीना समयोचित ज्ञान देत आहेत, एवढे मात्र नक्की.

टिप्पण्या