- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
file photo
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या धामधूमीत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांची प्रकृती काल रात्रीपासून बिघडली. आज पहाटे त्यांना पुण्यातील एका रुग्णालयात दाखल केले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आज त्यांची अँजिओग्राफी झाली असून उद्या सकाळपर्यंत अहवाल येणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.
वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळासाहेब यांच्या धमणीमध्ये एक लहान ब्लॉकेज आढळला आहे, जो अँजिओप्लास्टीने सहजपणे काढला जाऊ शकतो. त्यांची प्रकृती स्थिर असून, वैद्यकीय तज्ज्ञांच्या टीमकडून योग्य ती काळजी घेतली जात आहे.
दरम्यान दुपारच्या जेवणात बाळासाहेबांनी भाजी, डाळ, चपाती घेतली आहे.
बाळासाहेबांवर उद्या पुण्यात अँजिओप्लास्टी होणार आहे. तर बाळासाहेबांच्या अँजिओग्राफीचा अहवाल उद्या सकाळी 10 वाजता प्रसारमाध्यमांसमोर येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, बाळासाहेबांची प्रकृती स्थिर असून, तुम्ही तुमचे मतदारसंघ सांभाळा, असे आवाहन सुजात आंबेडकरांनी कार्यकर्त्यांना केले आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा