- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
balapur-constituency-shivsena: बाळापुर मतदार संघातून बळीराम सिरस्कार यांना उमेदवारी जाहीर; नितीन देशमुख यांच्या सोबत होणार तुल्यबळ लढत
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: जिल्ह्यातील बाळापुर मतदार संघातून शिवसेना शिंदे गटातून माजी आमदार बळीराम सिरस्कार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
बळीराम सिरस्कार यांच्या उमेदवारीमुळे आता बाळापूर विधानसभा मतदारसंघात यंदाची निवडणूक चुरशीची होणार असल्याची चित्र आहे. शिवसेना विरुध्द शिवसेना अशी ही लढत रंगणार आहे.
वंचित बहुजन आघाडीने सर्वात प्रथम या मतदारसंघातून माजी आ. ॲड. नातिकोद्दीन खतीब यांना उमेदवारी दिली आहे. एडवोकेट खातीब यांची या मतदारसंघावर पूर्वीपासूनच पकड आहे.
तर शिवसेना उबाठा कडून विद्यमान आमदार नितीन देशमुख दुसऱ्यांदा याच मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे.
या मतदारसंघात महायुतीकडून उमेदवारीचा सस्पेन्स कायम ठेवण्यात आल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र आज सायंकाळी माजी आमदार बळीराम सिरस्कार यांच्या नावाची घोषणा झाल्याने सस्पेन्स येथेच संपला. मात्र नव्या राजकिय समीकरणाची बाळापुरात सुरुवात झाली आहे.
जिल्ह्यातील हाय व्होल्टेज मतदारसंघ म्हणून बाळापूर विधानसभा मतदारसंघाकडे पाहल्या जाते. या मतदारसंघाचे विद्यमान आमदार नितीन देशमुख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा साथ सोडत गुवाहाटी येथून पळ काढत थेट ठाकरेंच्या सेनेत राहण्याचा निर्णय घेतल्याने नितीन देशमुख संपूर्ण राज्यात प्रसिद्धीस आले होते. मात्र यानंतर त्यांचे राजकीय वैर हे थेट मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. त्यातच भर म्हणून मध्यंतरी नितीन देशमुख यांची एसीबी कडून झालेली चौकशी यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. परंतू या मतदारसंघात ठाकरेंच्या सेनेकडून नितीन देशमुख यांना दुसऱ्यांदा या निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले.
देशमुख यांना शह देण्यासाठी शिंदे यांच्या सेनेकडून अर्थातच महायुतीकडून तुल्यबळ उमेदवाराचा शोध सुरू होता. आणि हा शोध बळीराम सिरस्कार यांच्या पर्यंत येऊन संपला. आता या मतदार संघात तुल्यबळ लढत पाहायला मिळणार एवढे मात्र निश्चित.
अशी आहे यादी
भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश
अकोल्यातील महायुतीचा जागा वाटपाचा तिढा सुटला असून चार मतदारसंघात भाजप तर एका मतदारसंघात शिवसेना शिंदे गट ही निवडणूक लढणार आहे. महायुतीत बाळापुरची एक मात्र जागा शिवसेना शिंदे गटाला देण्यात आली आहे. आज शिवसेनेने आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. यामध्ये बाळापुर मतदार संघातून माजी आमदार बळीराम शिरस्कार यांच्या नावाचा ही समावेश आहे. बळीराम शिरस्कार यांनी आजच भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला आणि आजच त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. भाजपाचे माजी आमदार नारायण गव्हाणकर सुद्धा शिवसेना शिंदे गटात प्रवेश करून उमेदवारीसाठी इच्छुक होते. बळीराम सिरस्कार यांचा वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि आता शिवसेना शिंदे गट असा राजकीय प्रवास आहे. बाळापुर मतदार संघाच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट मध्ये मोठी रस्सीखेच सुरू होती. या ठिकाणी आता बळीराम सिरस्कार यांच्या उमेदवारी नंतर बाळापुर मतदार संघात तिरंगी लढतीच चित्र निर्माण झाल असून सेना विरुद्ध सेना असा सामना रंगणार आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा