baba-siddiqui-murder-case -: बाबा सिद्दिकी हाय प्रोफाईल हत्याचे अकोला कनेक्शन! शुभम लोणकर हाच तर ‘शूबु लोणकर महाराष्ट्र’ नव्हे! मुंबई पोलिसांकडून तपास सुरू…

   File images: BAnews24 



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: बाबा सिद्दीकी. मुंबई तथा राज्यातील एक प्रमुख मुस्लिम नेता. त्यांची काल मुंबईत भररस्त्यावर गोळ्या घालुन हत्या करण्यात आली. यशस्वी राजकिय कारकीर्द आणि अनेक बॉलिवूड स्टार्सच्या जवळचे म्हणून ते ओळखले जात होते.  या हाय-प्रोफाइल हत्येमुळे भारताच्या आर्थिक राजधानीतील कायदा आणि सुव्यवस्थेवर देशभरातून तीव्र टीका होत आहे. दरम्यान गँगस्टर लॉरेन बिश्नोई याने या हत्येची जबाबदारी घेतली असल्याची एक पोस्ट ‘फेसबुक’ या सोशल मीडिया ॲपवर आज व्हायरल झाली. ही पोस्ट कोण्या ‘शुबू लोणकर महाराष्ट्र’ या पेज अकाउंट वरून पब्लिश  करण्यात आली आहे. याच नावाशी साधर्म्य असलेला आणि बिश्नोई गँगशी संबंध उघड झालेला शुभम लोणकर हा अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील आहे. त्यामुळे शुबु हाच शुभम असावा, असा कयास लावून मुंबई पोलीस या फेसबुक अकाउंटची व्हेरिफिकेशन करीत आहे. तसेच अकोट पोलिसांनी शुभम, त्याचा भाऊ आणि त्याच्या साथीदारांची चौकशी सुरू करून मुंबई पोलिसांना सहकार्य करीत आहे.



पोलीस स्टेशन अकोट शहर येथे 16 जानेवारी 2024 रोजी दाखल अप.क्र.31/2024 कलम 201, 34 भादंवि सहकलम कलम 3, 8, 25 आर्म ॲक्ट सहकलम 135 म.पो.का. या गुन्हयाचे तपासादरम्यान 10 आरोपींना अटक करण्यात आली होती. हया 10 आरोपीपैकी एक आरोपी  शुभम रामेश्वर लोणकर (मुळ गाव नेव्हरी बु ता. अकोट) हा होता. शुभम लोणकरला 30 जानेवारी 2024 रोजी वारजेनगर, पुणे शहर कडुन अटक करण्यात आली होती.


"शुबू लोणकर महाराष्ट्र" नावाचे फेसबुक पेजनी बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाचे अनुषंगाने एक पोस्ट व्हायरल केलेली आहे. हया पोस्टची खरी असण्याची शक्यता, या पोस्टचे मागे कोण आहे, हया सर्व गोष्टीचा तपास आणि व्हेरिफिकेशन मुंबई पोलीस कडुन होत आहे.


सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्ट मध्ये बाबा सिद्दीकीच्या हत्येची कबुली आहे. सलमान खान आणि दाऊद टोळीचाही उल्लेख केला गेला आहे.  सध्या मुंबई पोलिस पोस्ट आणि अकाउंटची सत्यता तपासत आहे.  व्हायरल पोस्ट मध्ये आमचे कोणाशीही वैर नाही, असे सांगण्यात आले. मात्र सलमान खान आणि दाऊद टोळीला कोण मदत असेल तर त्यांनी त्यांचे हिसाब किताब करुन ठेवावे, असे लिहल आहे.


दरम्यान बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी दोन आरोपींना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.  तर तिसऱ्या आरोपीचा शोध घेत आहेत. एक हरियाणातील गुरमेल सिंग (23) आणि दुसरा धर्मराज कश्यप (19), उत्तर प्रदेश अटकेतील आरोपींचे नाव आहेत. आरोपींनी बाबा सिद्दीकी यांचे घर आणि कार्यालयाच्या जागेची रेकी केली असून ते दीड ते दोन महिन्यांपासून मुंबईत राहत होते, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली.


तर काल रात्री बाबा सिद्दीकी हत्याची माहीती मिळाल्यावरून अकोट पोलीस यांनी आरोपींना विचारपुस करण्यासाठी स्वतःहुन दखल घेतली होती. या 10 पैकी 8 आरोपी जे अकोटचे व अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती येथील रहीवासी आहेत, त्यांना पोलीस स्टेशन अकोट शहरला बोलावून विचारपुस सुरू आहे. या 10 पैकी 2 आरोपी शुभम लोणकर व त्याचा भाऊ प्रविण लोणकर यांचे घरी काल रात्री त्यांना चेक केले असता ते दोघेही घरी हजर मिळून आले नाहीत. त्यांचे घराशेजारी विचारपुस करण्यात आली असता ते दोघेही माहे जुन, 2024 चे पहिल्या आठवडयात अकोटला सोडून गेल्याचे पोलीस तपासात समोर आले. 


जर गुन्हयासंबंधी महत्वपुर्ण माहीती समोर आल्यास अकोला पोलीस मुंबई क्राईम ब्रेन्च सोबत संवाद साधुन त्यांना सहकार्य करतील, असे अनमोल मित्तल (सहाय्यक पोलीस अधीक्षक अकोट उपविभाग, अकोट) यांनी म्हंटले आहे.


त्या घटनेचा मास्टर माईंड होता शुभम लोणकर 

    File image:BAnews24


16 जानेवारी 2024 रोजी पोलीस उपनिरीक्षक राजेश जवरे हे डि.बी. पथकासह पोलीस स्टेशन हददीत पेट्रोलींग करीत असतांना त्यांना गुप्त बातमी मिळाली की, दोन इसम हे अकोट ते अकोला रोडवर अकोला नाक्याचे पुलाखाली केशरी रंगाची पल्सर मोटरसायकल घेवुन उभे असुन त्यांचेजवळ देशी कट्टा (अग्निशस्त्र) आहे. यावरून सदर इसमांजवळ जावुन त्यांची अंगझडती घेतली असता, त्यांचेजवळ एक खाली मॅक्झीन मिळुन आल्याने त्यांना विचारपुस करून त्यांनी विहीरीत टाकलेले दोन देशी कट्टे व 09 जिवंत राउंड विर एकलव्य आपतकालीन पथकाचे मदतीने पंचांसमक्ष विहीरीतुन काढले. यातील आरोपी अजय तुलाराम देठे (वय 27 वर्ष रा. धोबीपुरा अकोट), प्रफुल्ल विनायक चव्हाण (वय २५ वर्ष रा. अडगांव बु ता तेल्हारा जि. अकोला) यांना मोटरसायकलसह पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांचेविरूदध अप.क. 31/24 कलम 3,25 आर्म ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करून तपासात घेतला. दोन्ही आरोपी यांना 17 जानेवारी  रोजी अटक करण्यात आली होती. त्यांचे कडुन गुन्हयाचे तपासात मास्टरमाइंड असलेला तीसरा आरोपी शुभम रामेश्वर लोणकर (वय 25 वर्ष, रा. नेवरी ता. अकोट, जि. अकोला ह. मु. भालेकर वरती, वारजे, पुणे) निष्पन्न केले होते. यानंतर पोलिसांनी त्याचा उजैन मध्यप्रदेश येथे जावुन शोध घेतला असता, तो तेथुन पसार झाला होता. त्यानंतर त्यास भालेकर वस्ती, वारजे, पुणे येथुन ताब्यात घेवुन 30 जानेवारी रोजी अटक करून त्यास अकोट न्यायालयात हजर केले होते. तपासा दरम्यान आरोपी शुभम लोणकर याचे मोबाईल वरून गॅगस्टर लॉरेन्स बिश्नोई सारख्या दिसणा-या व्यक्तीसोबत व्हिडीओ कॉल, त्याचा भाऊ अनमोल बिश्नोई याचे सोबत ऑडीओ कॉल तसेच इंटरनॅशनल नंबरवरून कॉल केल्याचे समोर आले होते.  



टिप्पण्या