atmosphere-against-congress: अज्ञातांकडून अकोल्यात सातत्याने काँग्रेस विरोधात पोस्टरबाजी; हरियाणा विधानसभा निवडणुकनंतर पुन्हा नवे पोस्टर !






भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : विधानसभा निवडणुक जसं जशी जवळ येत आहे, तसं अकोल्यात सतत काँग्रेस विरोधात वातावरण निर्माण करण्याचं काम अज्ञातांकडून काही दिवसांपासून सुरू आहे. हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीनंतर काँग्रेसचा झालेल्या पराभवावर अकोला शहरात आज परत नवीन काँग्रेस विरोधी पोस्टर्स बाजी पाहायला मिळत आहे. 



सर्वप्रथम आघाडीचे मित्र पक्षाचे ठाकरे गटाचे नगरसेवक यांनी काँग्रेसला विधानसभेसाठी अकोला पश्चिम मधून जागा न देण्याचे खुले आवाहन केले होते, आणि त्यानंतर काँग्रेस विरोधात या ठिकाणी अकोलेकरच्या नावाने बॅनरबाजी करण्यात आली होती.



काही दिवसानंतर परत काँग्रेसच्या विरोधात राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या नावाने बॅनरबाजी करून काँग्रेसला बदनाम करण्याचा कार्य करण्यात आलं.




आज पुन्हा हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीनंतर काँग्रेसचा झालेल्या पराभवावर परत अज्ञातांकडून ‘अकोलेकर’च्या नावाने पोस्टरबाजी करण्यात आली आहे. तर काँग्रेस फक्त हारण्यासाठीच उभी राहते का असा प्रश्न या पोस्टर द्वारे उपस्थित करण्यात आला आहे.


मात्र आता काँग्रेस विरोधात बॅनरबाजी करणारे हे अकोलेकर कोण याची चर्चा सुरू झाली आहे. तर एवढं सर्व होत असताना अकोल्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी याविरुद्ध अद्यापही ठोस पाऊले उचलली नाहीत, याचे  काँग्रेसप्रेमी जनतेस आश्चर्य वाटत आहे.

टिप्पण्या