assembly-election-murtijapur: मुर्तिजापूर मतदार संघात भाजपचा उमेदवार कोण? हरिश पिंपळे, रवि राठी की आणखी तिसरा कोणी?




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : भाजपने अकोला जिल्ह्यातील चार पैकी अकोला पूर्व , अकोला पश्चिम आणि अकोटच्या जागेवरील आपल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे. मात्र मुर्तिजापूर मतदार संघातील आपल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा अद्यापही गुलदस्त्यात ठेवल्याने मतदारांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 



दोन दिवसांआधी शरद पवार गटाचे नेते रवी राठी यांनी भजप मध्ये प्रवेश केल्याने भाजपचे विद्यमान आमदार हरिष पिंपळे यांचा तिकीट कटणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. तर दुसरी कडे तिकीट मिळविण्यासाठी रवी राठी नागपूरात तळ ठोकून आहेत. 



अशा सर्व परिस्थितीत हरिष पिंपळे यांचे समर्थक पिपळेंना तिकीट देण्यात यावं, याकरिता भाजप नेत्यांना साकडे घालत आहेत . तर पक्षाने हरिष पिंपळे यांना उमेदवारी न दिल्यास भाजपा पदाधिकाऱ्यांनी राजीनामे द्यावेत, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे. 


याठिकाणी वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीने आपल्या उमेदवाराची घोषणा केली आहे. नामांकन अर्ज भरण्याची शेवटच्या तारखेला केवळ दोन दिवस शिल्लक राहिल्याने भाजपचा मुर्तिजापूर मधील उमेदवार कोण ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टिप्पण्या