assembly-election-akola-west: अकोला पश्चिमसाठी भाजपचे संजय बडोणे यांची दावेदारी!




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : अकोला पूर्व मतदार संघातून भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांना पक्षाने पुन्हा संधी दिली आहे. त्यामुळे आता पक्षश्रेष्ठीकडे अकोला पश्चिम मधून अनेक भाजपच्या नेत्यांनी मागणी केलेली आहे. अकोला पश्चिम साठी भाजपमध्येच उमेदवारी करिता मोठी रस्सीखेच सुरू आहे. 



महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती तथा 5 वेळा भाजपचे नगरसेवक राहिलेले संजय बडोणे यांनी सुद्धा उमेदवारी मिळावी, यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मागणी केली आहे. संजय बडोने अकोला पश्चिम साठी इच्छुक असून, या जगेसाठी दावेदारी केली आहे.




अकोला पश्चिम मध्ये महाविकास आघाडी मधील वाद समोर आल्यानंतर आता भाजपमध्येही या जागेसाठी उमेदवारांमध्ये स्पर्धा निर्माण झाली आहे.


टिप्पण्या