assembly-election-akola-east-: रणधीर सावरकर यांना उमेदवारी जाहीर होताच चाहत्यांनी केले स्वागत; भाजप कार्यालय गर्दीने फुलले




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : भारतीय जनता पक्षाने आपली महाराष्ट्र विधानसभा निवडणूकसाठी उमेदवारांची पहिली यादी आज सायंकाळी प्रसिध्द केली. या यादीत अकोला पूर्व मतदार संघातून विद्यमान आमदार रणधीर सावरकर यांना उमेदवारी देण्यात आली.




सुशिक्षित,अभ्यासू आणि तडफदार आमदार म्हणून रणधीर सावरकर यांची ओळख आहे. रणधीर सावरकर यांनी सलग दोन वेळा या मतदारसंघाच नेतृत्व केल आहे. त्यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अकोल्यात भाजप कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयात स्वागत करून जल्लोष केला. 



अकोला पूर्व मतदारसंघातून महायुतीने सर्वात आधी आपला उमेदवार जाहीर केला आहे.या ठिकाणी महाविकास आघाडी मध्ये ठाकरे गट आणि काँग्रेस मध्ये जागेसाठी रस्सीखेच सुरू आहे. रणधीर सावरकर यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे, त्यामुळे सावरकर आता हॅट्रिक साधतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




यावेळी खासदार अनुप धोत्रे, ॲड. सुभाष ठाकूर, जयंत मसने यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.



स्वागत प्रसंगी जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचं रणधीर सावरकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.



टिप्पण्या