artificial-modular-limb-fitting-: अकोला शहरात भव्य मोफत कृत्रिम मॉड्‌यूलर हात-पाय बसविणे शिबिराचे आयोजन; दिव्यांगांनी लाभ घेण्याचे आवाहन




ठळक मुद्दा 

भारत विकास परिषद अकोला व विकलांग केंद्र पुणे आयोजित जंगम मठ संस्थान व वीरशैव लिंगायत समाज अकोला यांच्या सहयोगाने गेल इंडिया लिमिटेड या कंपनीच्या सीएसआर निधी अंतर्गत 350 दिव्यांगांना अत्याधुनिक कृत्रिम मॉड्युलर पाय आणि हात व पोलिओ केली पर मोफत बसविण्यात येणार आहे.




भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: सामजिक व मानविय सेवा कार्यात सक्रिय असणाऱ्या भारत विकास परिषद, अकोला व विकलांग केंद्र, पुणे यांच्या वतीने व जंगम मठ संस्थान व वीरशैव लिंगायत समाज व  गेल इंडिया लि. यांच्या सहकार्याने दिव्यांगांना अत्याधुनिक कृत्रिम मॉड्‌यूलर पाय आणि हात व पोलिओ कॅलिपर मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.याची तयारी जोमात सुरू असल्याची माहिती भारत विकास परिषद, अकोला शाखाध्यक्ष ईश्वर आनंदानी व परिषदचे विश्वस्त व विकलांग केंद्रप्रमुख विनय खटावकर (पुणे) यांनी आज सिंधी कॅम्प येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.




यावेळी परिषदेचे उपाध्यक्ष राम ठक्कर, संघटन प्रमुख ओमप्रकाश जसवाणी, ग्राम विकास प्रमुख सुषमा पाटील, किंजल देडिया, प्रणव पाटील आदी उपस्थित होते.




25 ऑक्टोबर रोजी स्थानीय सिविल लाइन येथील जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथे सर्व दिव्यांगांची कृत्रिम हात पाय लावण्यासाठी मापे घेण्यात येणार आहेत. दिव्यांग व सोबती यांचेसाठी मोफत भोजन, चहा इ. सोय उपलब्ध करण्यात येणार आहे. 


अत्याधुनिक कृत्रिम मॉड्युलर पायाची किमंत  10 हजारापेक्षा जास्त व कृत्रिम हाताची  किमंत 25 हजारापर्यंत आहे. असे कृत्रिम अवयव ह्या शिबिरात 350 गरजू दिव्यांगांना देणार आहोत. आतापर्यंत 170 जणांनी यासाठी नोंदणी केली आहे. वेळेवर येणाऱ्या दिव्यांगाची निराश न करता त्यांना देखील योग्य ते मार्गदर्शन करण्यात येईल. तसेच पुढल्या शिबिरकरिता नाव नोंदविण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले.


हे अत्याधुनिक कृत्रिम पाय ऑटोफोल्ड असून वजनाने हलके आहेत. अत्याधुनिक कृत्रिम मॉड्यूलर पाय बसविल्यानंतर दिव्यांग व्यक्ती चालणे, पळणे, पोहणे, उडी मारणे, वाहन चालविणे व शेती कामे इ. प्रकारच्या दैनंदिन क्रिया करू शकतात, त्याबाबत त्यांना मार्गदर्शनही केले जाते. 



दर वर्षी विविध सेवाभावी संस्था मार्फत सुमारे 5 हजार दिव्यांगांना कृत्रिम अवयव देण्यात येत असून अकोला येथील या शिबिरासाठी रवि कोल्हे (अमरावती, संचालक गेल इंडिया) यांच्या प्रयत्नाने हा उपक्रम साकार करण्यात आला असल्याचे यावेळी परिषदेचे अकोला शाखा अध्यक्ष आर्कीटेक्ट ईश्वर आनंदानी यांनी सांगितले.


अकोला व जवळपासच्या सर्व जिल्ह्यातील गरजू दिव्यांगांनी या मोफत  शिबिराच्या नोंदणीसाठी अनिकेत 9422797106, जयंत 9930265304 यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन  ईश्वर आनंदानी यांनी यावेळी केले.




पत्रकार परिषदेला वीरशैव लिंगायत समाजचे पदाधिकारी दीपा सालपेकर, चंद्रशेखर एकघरे, रविंद्र करंजकर, मुकुंद भूकन, मनोज भुरे समवेत भारत विकास परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या