akot-court-hiwarkhed-crime: मुलीसोबत असभ्य वर्तन; आरोपीस सश्रम कारावासाची शिक्षा, हिवरखेड येथील घटना

  file image 





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: अकोट तालुक्यात 16 वर्षीय अल्पवयीन मुलीची छेडखानी व विनयभंग केल्याचे प्रकरणात आरोपी सैयद हाफिजोदद्दीन, यास तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व 40 हजार रूपये दंड अशी शिक्षा अकोट न्यायलयाने आज सुनावली आहे.



आज 14 ऑक्टोबर रोजी अकोट येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश  बी.एम. पाटील यांनी विशेष खटला क्रमांक 18/2018 भादंविचे कलम 354(अ) (ड), 363 सहकलम 7.8 पोक्सो प्रमाणे आरोपी सैयद हाफिजोदद्दीन सिराजउददीन ( वय २५ वर्षे रा. हिवरखेड, ता. तेल्हारा, जि. अकोला) याने एका 16 वर्षीय  अल्पवयीन मुलीची रामनवमीच्या दिवशी छेडखानी व विनयभंग केल्याचे सिध्द झाल्याने, आरोपीला भादंविचे कलम 354 (अ) (ड), 363 सहकलम 7,8 पोक्सो प्रमाणे 3 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा 40 हजार रूपये दंडासह ठोठावली व आरोपीने दंडाची रक्कम भरल्यास संपुर्ण रक्क्म 40 हजार रूपये नुकसान भरपाई म्हणून पीडितेला देण्यात यावी. व आरोपीने 40 हजार रूपये दंड न भरल्यास आरोपीला अतिरिक्त 24 महीने सश्रम कारावास भोगावा लागेल. असे आदेशामध्ये नमुद केले आहे. अशी शिक्षा कोर्टाने आरोपीला ठोठावली.



या प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी की,  26 मार्च 2018 रोजी 16 वर्षीय पीडितेने हिवरखेड पोलीस स्टेशन येथे आरोपी सैयद हाफिजोददीन सिराजउददीन, विरूध्द फिर्यादी दिली होती. पीडिता हि दहाव्या वर्गात शिक्षण घेत असून परीवारासह राहत आहे. आरोपी सैयद हाफिजोददीन सिराजउददीन, याला पीडिता ओळखत असे व आरोपी वाईट उददेशाने पीडित मुलीकडे पाहत असे व पीडितेवर लक्ष देवून पीडितेच्या घराकडे चकरा मारत असे. घटनेच्या दिवशी म्हणजे 25 मार्च  रोजी रात्री अंदाजे 8.30 वाजताच्या दरम्यान सार्वजनिक शौचालयाकडे जात असतांना आरोपी सैयद हाफिजोदद्दीन, हा पीडित मुलीजवळ आला व तिला म्हणाला की, तु माझ्या सोबत चल, तेव्हा अल्पवयीन फिर्यादी पीडित मुलीने आरोपीला मनाई केली असता आरोपीने फिर्यादी पीडित मुलीचा हात धरला व तिला जबरदस्तीने सार्वजनिक शौचालयाच्या इमारतीमध्ये नेले, तेव्हा त्या ठिकाणी अंधार होता व अंधारामध्ये आरोपीने पीडिते सोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा बाहेरून कोणाचा तरी बोलण्याचा आवाज आल्याने आरोपी सैयद हाफिजोदट्टीन सिराजउदद्दीन, हा शौचालयाचे भिंतीवरून उडी मारून पळून गेला. व जातांना म्हणाला की, फरदीन इसको घर छोड दे. यानंतर फरदीन याने मुलीला जबरदस्तीने गाडीवर बसवीले. रस्त्यात ओळखीच्या लोकांनी गाडी थांबवीली तेव्हा फरदीन गाडीवरून उतरून पळून गेला. पीडिताने घरी आल्यावर आई वडीलांना घटना सांगीतली. घटनेच्या दिवशी रामनवमी असल्याने दुसऱ्या दिवशी पीडितेने फिर्याद दिल्यावरून आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. 



यामधील दुसरा आरोपी फरदीन खा. नियामत खा. हा अल्पवयीन असल्यामुळे बाल न्यायमंडळ अकोला येथे त्याच्या विरूध्द दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. आरोपी सैयद हाफिजोददीन सिराजउददीन विरूध्द  तपास अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांनी आरोपी विरूध्द अकोट सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. या प्रकरणात पैरवी म्हणुन हिवरखेड पोलीस स्टेशनच्या ज्योती तेलगोटे यांनी कामगीरी केली. तसेच सरकार तर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी एकुण 05 साक्षीदारांच्या साक्षी न्यायालयामध्ये नोंदविल्या. यामध्ये प्रामुख्याने पीडिता तिची आई तसेच मुख्याध्यापीका यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. 


शिक्षेसंबंधी युक्तीवाद करतांना न्यायालयात सरकारी वकील अजित देखमुख यांनी सरकार तर्फे युक्तीवाद केला की, या प्रकरणात हिंदु अल्पवयीन मुलीवर आरोपी सैयद हाफिजोददीन सिराजउददीनने रामनवमीच्या दिवशी  अत्याचार केलेला आहे. राज्यामध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचे प्रमाण दिवसें दिवस वाढत आहे. आरोपीने केलेला गुन्हा हा अतिशय गंभिर स्वरूपाचा आहे. व आरोपी विरूध्द न्यायालयात गुन्हा सिध्द झाल्याने या 25 वर्षीय आरोपी सैयद हाफिजोददीन सिराजउददीनवर कुठलीही दया न दाखवता याला जास्तीत जास्त कठोर कारावासाची शिक्षा दंडासह ठोठावण्यात यावी. व दोन्ही पक्षाच्या युक्तीवादा नंतर विद्यमान कोर्टाने या खटल्यामध्ये वरील प्रमाणे 3 वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा 40 हजार रूपये दंडासह आरोपीस ठोठावली.


टिप्पण्या