akola-west-constituency-bjp-: ‘आपला माणूस’ डॉ. अशोक ओळंबे यांची अकोला पश्चिम मतदार संघासाठी जोरदार तयारी…





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: जिल्ह्यातील अकोला पश्चिम मतदार संघात अद्यापही एकाही राजकीय पक्षाने आपला उमेदवार घोषित केला नसल्याने येथे रंजकता वाढली आहे. कोणाला तिकीट मिळेल आणि कोणाची तिकीट कापल्या जाईल, याबाबतच्या चर्चा जनसामान्यात चांगल्याच रंगत आहेत. मात्र या सर्वामधे अकोला पश्चिम मतदार संघात राजकीय वातावरण चांगलेच तापण्याचे चिन्ह आहेत.


अकोला पश्चिम मतदार संघात महाविकास आघाडी आणि महायुती दोन्ही मध्ये उमेदवारांच्या नावांच्या घोषणेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दोन्ही बाजूने उमेदवारांची संख्या मोठी आहे. छातीठोकपणे इच्छुक उमेदवार आपली प्रबळ दावेदारी सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहेत.


अकोला पश्चिम हा भाजपचा गेल्या तीन दशकांपासून गड राहिला आहे.भाजपने या ठिकाणी अद्यापही उमेदवाराच्या नावाची घोषणा केली नाही. मात्र आपली उमेदवारी निश्चित असल्याचा दावा भाजपाचे ओबीसी मोर्चाचे प्रदेश महासचिव तथा भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ. अशोक ओळंबे यांनी केला आहे.


2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा अशोक ओळंबे यांना डावलण्यात आलं होत आणि त्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून नामांकन अर्ज भरला होता. मात्र भाजपच्या वरिष्ठांनी त्यांची मनधरणी केल्यानंतर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. मात्र यंदाही भाजपने आपला नावाचा विचार न केल्यास अपक्ष म्हणून निवडणूक लढणार असल्याच्या आपल्या भूमिकेवर आता अशोक ओळंबे ठाम आहेत.



डॉ.अशोक ओळंबे यांच्या या भूमिकेमुळे निश्चितच भाजपची अकोला पश्चिम मध्ये डोकेदुखी वाढणार आहे. अशोक ओळंबे यांची निवडणुकीच्या आधीच जोरदार तयारी सुरू आहे  ' आपला माणूस ' म्हणून प्रचाराला देखील त्यांनी आधीपासूनच सुरुवात केली आहे.



डॉ. ओळंबे यांनी या भागात कित्तेक वर्षापासून अविरत निस्वार्थ सामाजिक उपक्रम राबविले आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना ते आपलेसे वाटतात. दांडगा जनसंपर्क असल्यामुळे डॉ. ओळंबे यांना लोकप्रियतेचे वलय देखील प्राप्त आहे, त्यामुळे आपल्या माणसाला निश्चितच उमेदवारी मिळेल, अशी ठाम आशा त्यांच्या चाहता वर्गाला आहे.




“यंदाही भाजपने आपल्या नावाचा विचार न केल्यास अपक्ष म्हणून निवडणूक लढणार.”


डॉ.अशोक ओळंबे , 

भाजप 

इच्छुक उमेदवार

अकोला पश्चिम 

टिप्पण्या