akola-west-assembly-election: मनसे उमेदवार प्रशंसा अंबेरे यांचा नामांकन अर्ज रद्द




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला:  जिल्ह्यातील अकोला पश्चिम मतदार संघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत उमेदवार प्रशंसा अंबेरे यांचा नामांकन अर्ज रद्द करण्यात आला आहे.



विधानसभेच्या निवडणुकीकरिता निवडणूक आयोगाने 25 वर्ष पूर्ण केलेल्या व्यक्तीला उमेदवार म्हणून निवडणूक लढण्याची अट दिली आहे. मात्र अकोला पश्चिमच्या मनसेच्या उमेदवार प्रशंसा अंबेरे यांच वय 25 पेक्षा कमी असल्याने यांचा नामांकन अर्ज छाननी दरम्यान बाद करण्यात आला आहे.




मनसे उमेदवार यांना 25 वर्ष पूर्ण करण्याकरिता 24 दिवसांचा अवधी बाकी असल्याचा कारणाने त्यांचा नामांकन अर्ज रद्द करण्यात आला असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले आहे.




टिप्पण्या