“अकोला पूर्वच्या विकासाला माझे नेहमीच प्राधान्य राहिले आहे. आता पुढेही राहील. समोर रिंगणात कोणीही असले तरी आम्ही विजयाचा निर्धार करूनच मैदानात उतरलो आहे. महायुतीने केलेल्या कामाच्या जोरावर जनता पुन्हा आपल्याला निश्चितच निवडून देणार असा माझा ठाम विश्वास आहे. तर अकोल्याचे लोकप्रिय आमदार गोवर्धन शर्मा उर्फ लालाजी (स्वर्गीय) हे आज सोबत नसल्याने त्यांची उणीव याप्रसंगी भासत आहे."
– आमदार रणधीर सावरकर
31 अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाचे भाजपा - महायुतीचे अधिकृत उमेदवार
शेतकरी ते ऑटो चालक, वृत्तपत्र विक्रेता, वारकरी व समाजातील पिडीत, वंचित समाजासाठी महामंडळे निर्माण करून लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून दिपउत्सव साजरा करण्यासाठी लाडकी बहिणींना एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी मदत पाठवून समाज हित राष्ट्रहित सोबत सामाजिक दायित्व पूर्ण केले. शहरी आणि ग्रामीण समस्या निराकरणा सोबत मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, गेल्या 10 वर्षात आमदार रणधीर सावरकर यांनी सर्वस्पर्शी विकास करून समाजातील सर्व घटकांना एकत्रित केले. जात पात पेक्षा विकास आणि संस्कृती संवर्धानाचे काम केल्यामुळे त्यांचे नामांकन पत्र दाखल करतांना सर्व स्तरातील नागरिकांचा पक्ष, जात भेद विसरून त्यांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थिती हे त्यांच्या कार्याची पावती असल्याचे प्रतिपादन आमदार प्रकाश भारसाकळे यांनी केले.
आज तिसऱ्यादा अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातून विजयाचा संकल्प घेऊन भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस रापाई आठवले, रिपाई कवाडे, रिपाई कुंभारे गटाचे महायुती चे उमेदवार आमदार रणधीर सावरकर यांनी आज भाजपा कार्यालयातून मिरवणुकीदारे नामांकन दाखल करतांना ते बोलत होते.
यावेळी खासदार अनुप धोत्रे, आमदार अमोल मिटकरी, आमदार हरीष पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल,आमदार विप्लव बाजोरिया, माजी आमदार गोपीकिसन बाजोरिया, बळीराम शिरस्कार, किशोर पाटील, जयंत मसने, वैशाली निकम, अश्विन नवले, योगेश अग्रवाल, गौरव देशमुख, प्रदीप झापर्डे, विजय अग्रवाल, सुहासिनी धोत्रे, मंजुशा सावरकर, समिक्षा धोत्रे, अर्चना शर्मा, शिवाजी देशमुख, विजय सोळंके, गीतांजली शेगोकार, सुमन गावंडे, उषा विरक, उमादेवी शर्मा, चंदा शर्मा, हरीश अलमचंदनी, श्रावण इंगळे, डॉ. अशोक ओळंबे, शशी चोपडे, गजानन नळकांडे, संतोष शिवरकर, राजेश बेले, अशोक गुप्ता, वसंत बाछुका शंकर वाकोडे, तेजराव थोरात आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी मतदारांच्या ताकदीने आपण अकोला पूर्व विधानसभा मतदार संघातून मोठ्या संख्येने विजयी होवू, अशा विश्वास आमदार रणधीर सावरकर यांनी व्यक्त केला.
वारकरी तसेच भजनी ढोल, गोंधळी समाज, बंजारा समाज, आदिवासी, कोळी समाज बांधव परम्पारकत वेशभूषेमध्ये येऊन तसेच ठिकठिकाणी औक्ष्वण करून विविध सामाजिक संघटना, व्यापारी संघाना यांनी आमदार रणधीर सावरकर यांचे स्वागत करून आशीर्वाद दिले.
तत्पूर्वी ग्रामदैवत राजराजेश्वर, तपे हनुमान, राममंदिर, गजानन महाराज यांचे मंदिरात जाऊन श्री सावरकर यांनी दर्शन घेतले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा