akola-big-breaking-riots-in-city: जुने शहरात उसळली दंगल ; हरीहर पेठ भागात तणावाचे वातावरण, तगडा फौजफाटा तैनात






भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: जुने शहरातील हरिहर पेठ भागात आज सायंकाळी अचानक दोन गटात राडा झाला. 


यावेळी तुफान दगडफेक झाल्याने अनेक नागरिक जखमी झाले आहेत.



काही वाहनांची जाळपोळ करण्यात आली आहे.



दंगलीने उग्र रूप धरले. यावेळी पोलिसांचा मोठा फोजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे.


सध्या घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक नागरिकांमधे भीतीचे वातावरण पसरले आहे.




दरम्यान जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी केला लाठीचार्ज केला आहे.


नागरिकांनी भयभीत होवू नये. तसेच कुठल्याही प्रकारची अफवा पसरवू नये,असे आवाहन पोलीस विभागाने केले आहे.


ऑटोरिक्षाला धडक लागल्यामुळे ही दंगल उसळलची प्राथमिक माहिती समोर येत आहे.



टिप्पण्या