भारतीय अलंकार न्यूज 24
अकोला: भारत निवडणूक आयोगाने 15 ऑक्टोंबर 2024 रोजी महाराष्ट्र राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्याअनुषंगाने 15 ऑक्टोंबर 2024 पासून तात्काळ प्रभावाने अकोला जिल्ह्यामध्ये आदर्श आचार संहिता लागू झाली असल्याने आदर्श आचार संहीतेचे उल्लघन होवू नये म्हणून मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.सुनिल लहाने यांच्या व्दारे अकोला महानगरपालिका क्षेत्रामधील विविध भागात राजकीय पक्षाचे होर्डींग, शुभेच्छा फलक, बॅनर्स, झेंडे, पताका इत्यादी तात्काळ काढण्याची तसेच राजकीय पक्षाचे विकास कामांचे फलक झाकण्याची कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले होते.
या अनुषंगाने मनपा पुर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण झोन कार्यालय, बाजार परवाना विभाग आणि नगररचना, अनाधिकृत अतिक्रमण विभागाव्दारे अकोला महानगरपालिका क्षेत्रातील राजकीय पक्षाचे होर्डींग, शुभेच्छा फलक, बॅनर्स, झेंडे, पताका काढण्याची तसेच राजकीय पक्षाचे विकास कामांचे फलक झाकण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.
या कारवाईत चारही झोन कार्यालयाचे सहा.आयुक्त विजय पारतवार, विठ्ठल देवकते, देविदास निकाळजे, दिलीप जाधव, सहा.नगररचनाकार राजेंद्र टापरे, सहा.अतिक्रमण अधिकारी प्रवीण मिश्रा, चंद्रशेखर इंगळे यांचेसह झोन कार्यालय, बाजार परवाना विभागाचे तसेच अतिक्रमण विभागाचे कर्मचा-यांचा समावेश होता.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा