accidents-flyovers-akola-city: उड्डाणपुलावर अपघात; एक ठार






भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: सिविल लाइन पोलिस ठाणे हद्दीत येत असलेल्या उड्डाण पुलावर काल (19 ऑक्टोबर) रात्री दुचाकी वाहनाला ट्रकने जोरदार धडक दिल्याने दुचाकी स्वार जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली.




प्राप्त माहितीनुसार, अपघात वेळी पाऊस सुरू होता. यावेळी आयशर ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वार जागीच गतप्राण झाला. कैलास टेकडी निवासी ध्रुव संतोष कुमरे असे मृतक युवकाचे नाव असल्याचे समजते.




घटनेची माहिती मिळताच पोलीस घटना स्थळी पोहचले. त्यानतंर पुढील प्रक्रिया पार पाडली.

टिप्पण्या