- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
zilla-parishad-primary-school: विराट आक्रोश मोर्चा: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्षक हजारोंच्या संख्येने उतरले रस्त्यावर; अकोल्यातील तीन हजार शिक्षक सामुहिक रजेवर
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्षकांनी आज एक दिवसीय राज्यव्यापी सामुहिक रजा आंदोलन केले आहे. अकोला जिल्ह्यातही महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघटनेचे (सर्व संघटना) 3159 शिक्षक या आंदोलनात सहभागी झाले असून, आज दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास शहरातील मुख्य मार्गावरून विराट आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
राज्यात सुधारीत शिक्षक संच मान्यता आणि कंत्राटी शिक्षक भरतीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. याला राज्यातील सर्व शिक्षक संघटनांनी कडाडून विरोध केला आहे.
सुधारीत शिक्षक संच मान्यता आणि कंत्राटी शिक्षक भरतीच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाल्यास राज्याच्या ग्रामीण भागातील 1 लाख 85 हजार विद्यार्थी आणि 29 हजाराहून अधिक शिक्षकांचे भवितव्य अंधारात जाण्याची भीती व्यक्त होत आहे. शासनाने हे दोन्ही निर्णय रद्द करावेत, यासाठी राज्यभरातील सर्व शिक्षक संघटना एकवटल्या आहेत. या संदर्भात शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली होती. मात्र अद्यापही कुठलाच ठोस निर्णय शासनाने घेतला नाही. यामुळे सर्व शिक्षक आज हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरलेत.
कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये शिक्षकांची कंत्राटी नियुक्ती, विद्यार्थ्यांना गणवेश न मिळणे, अध्यापन सोडून करावी लागणारी प्रशासकीय कामे अशा विविध 21 मुद्द्यांवर राज्यातील शिक्षकांनी आज आंदोलन केले आहे.
शिक्षक संघटनातर्फे राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यामध्ये सहभागी होण्यासाठी पालकांना देखील आवाहन केले होते. मात्र पालकांनी आंदोलनात सहभागी होण्यास फारसा उत्साह दाखविला नाही.
दरम्यान, शिक्षण विभागाच्या निर्णयाविरोधात प्राथमिक शिक्षकांची काही दिवसांपूर्वी पुण्यात बैठक झाली. यात शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांचा सहभाग असलेले व्हॉट्सअप ग्रुप सोडणे, काळी फित लावून काम करणे, अशाप्रकारचे विरोध दर्शविण्यात आला होता. मात्र, आता शिक्षकांनी एक दिवसाची रजा घेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. याचा परिणाम राज्यातील बहुतांश शाळेवर झाला असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा