- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
youth-festival-chatra-tarang-24: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ युवा महोत्सव ‘छात्र तरंग’ चे अकोल्यात थाटात उद्घाटन
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
संगाबा अमरावती विद्यापीठाच्या "छात्र तरंग" युवा महोत्सवात विद्यार्थ्यांनी भरले कलेचे विविध रंग
भारतीय अलंकार न्यूज 24
ॲड. नीलिमा शिंगणे जगड
अकोला : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती अंतर्गत स्थानिक शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयात चार दिवसीय "छात्र तरंग" युवा महोत्सवाचा शुक्रवारी थाटात शुभारंभ झाला. या युवा महोत्सवाचे उद्घाटन खासदार अनुप धोत्रे यांच्या हस्ते संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते होते. यावेळी व्यासपीठावर शिक्षण प्रसारक मंडळ अकोलाचे अध्यक्ष डॉ.ताराताई हातवळणे, सचिव गोपाल खंडेलवाल, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ राजीव बोरकर, अरुण उर्फ नाना कुलकर्णी, रेखा खंडेलवाल, मधुर खंडेलवाल, प्राचार्य जगदीश साबू, युवा महोत्सव निवड समितीचे अध्यक्ष डॉ. राहुल एकबोटे, डॉ. सावन देशमुख, डॉ. निखिलेश नलोडे, नेत्रा मानकर, डॉ सुरज हेरे, सीमा देशमुख, महाविद्यालय समन्वयक डॉ. ज्ञानसागर भोकरे, सुमेध कावळे, डॉ. निशा वराडे, डॉ. अरुण शेळके उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते द्वीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमात स्वागतपर भाषण प्राचार्य डॉ जगदीश साबू तर प्रास्ताविक डॉ. राजीव बोरकर यांनी केले.
कार्यक्रमांमध्ये मागील वर्षी यशस्वी आयोजन करणाऱ्या राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या जया इंगोले व समुह, उत्कृष्ट विद्यार्थी अमर कंगोरे, सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी संजना जवंजाळ, सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय छात्र सेना कॅडेट श्रीकांत मोरे, अन्नपूर्णा कुशवाह, सर्वेश पाठक, रोशनी बोरले यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. राहुल एकबोटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
उद्घाटनपर भाषणात खासदार अनुप धोत्रे यांनी, नव्या काळात विद्यार्थ्यांपुढे अनेक संधी आहेत. त्या संधीचा योग्य तो फायदा घेऊन आपल्या कलागुणांना वाव द्यावा. विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात अनेक गुण अंगिकारावे आणि रोजगाराच्या विविध संधींचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन केले.
अध्यक्षीय मार्गदर्शन करताना मिलिंद बारहाते यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड ऊर्जा असते.याचा उपयोग विद्यार्थ्यांनी कलागुण जोपासण्याकरिता करावा. विद्यापीठाचा युवा महोत्सव सर्वांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा आहे. यात नेतृत्व, सामूहिकता, कलाप्रियता महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या सुप्त गुणांना व्यक्त करावे, असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. डिंपल मापारी, प्रा अदिती मानकर यांनी तर आभार सुमेध कावळे यांनी मानले. संजय तिकांडे यांनी वंदे मातरम गायिले. यावेळी विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.
युवा महोत्सवाच्या पहिल्या दिवशी अमरावती, अकोला, बुलढाणा वाशिम व यवतमाळ अशा पाचही जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यामध्ये लोकसंगीत अंतर्गत ढोलकी, ढोल,नगारा,डफ, हलगी, मृदंग, नाल, लहान ढोल, मोठा ढोल,संबळ, तुणतुणे तुतारी, बासुरी, शंख, चौंडक इत्यादी भारतीय वाद्यांचे वादन करण्यात आले.
भारतीय समूहगीत स्पर्धेत विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यामध्ये राष्ट्रीय,पारंपरिक पद्धतीचे गीत गायन करण्यात आले. प्रहसन व मूकनाट्य स्पर्धेमध्ये अनेक समूहांनी सहभाग नोंदविला. यात अकोला व अमरावती ग्रामीण परिसरातील महाविद्यालये प्रमुख होती. शास्त्रीय गायन स्पर्धेत विविध समूहांनी सहभाग नोंदविला. यात भारतीय व कर्नाटकी पद्धतीचे शास्त्रीय गायन करण्यात आले. एकांकिका स्पर्धेमध्ये ज्वलंत, सामाजिक व तरुणाईला भेडसावणाऱ्या समस्या या विषयावरील विविध एकांकिका सादर करण्यात आल्या.
स्पॉट फोटोग्राफी स्पर्धेमध्ये नेचर, जलतरंग व प्रकाश छटा यावरील फोटोग्राफीचा समावेश करण्यात आला होता. सोबतच चित्रकला स्पर्धे अंतर्गत लँडस्केप, ऍनिमल आणि फेस मास या विषयावरील स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती.
सर्वांचे आकर्षण असणाऱ्या नृत्य स्पर्धेमध्ये अकोला व अमरावती ग्रामीण या भागातील महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला. यामध्ये गोंधळ, हरियाणवी, राजस्थानी, गुजराती ,जोगवा, कालबेलीया, जागर व मराठी संस्कृतीशी संबंधित विविध प्रकारच्या पारंपरिक लोककलांसंदर्भात नृत्य सादर करण्यात आली. विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटला. अशी माहिती प्रसिद्धी विभागाचे समन्वयक डॉ. श्रीकृष्ण काकडे यांनी दिली आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा