youth-festival-amt-university: “छात्र तरंग” युवा महोत्सवात दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांनी उधळले नृत्यरंग; वक्तृत्व व समूह गायन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद




भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती अंतर्गत युवा महोत्सव कालपासून स्थानिक शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयात सुरू झाला. आज या महोत्सवाचा दुसरा दिवस होता. यामध्ये  अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम व यवतमाळ अशा पाचही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवित विविध कलेचे प्रदर्शन केले. 



आज नृत्य स्पर्धेत अमरावती शहरातील विविध महाविद्यालयांनी सहभाग घेतला. यामध्ये दिवाळी नृत्य, जागर,गोंधळ, आदिवासी व लोकगीतांवरची नृत्य विद्यार्थ्यांनी सादर केली. या नृत्यांमध्ये विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या  नवकल्पनाचा वापर केला. याचे समन्वयक प्रा.रोहन शिरसाट व प्रा. जयश्री सकळकळे होत्या. 



वादविवाद स्पर्धेमध्ये एकूण 27 महाविद्यालयांनी 53 सहभागी सहभाग नोंदविला. यामध्ये "परिवारो मे घटती नैतिक शिक्षाही समाज मे बढते दुष्कर्म का कारण है? या विषयावर विरोधी व संमत मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

 



एकांकिका स्पर्धेमध्ये अमरावती शहरातील महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला. यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, स्त्री सक्षमीकरण, व्यवसाय निवडीचे स्वातंत्र्य अशा विविध विषयावर विद्यार्थ्यांनी एकांकिका सादर केल्या. या स्पर्धेचे समन्वयक प्रा डिंपल मापारी, शेखर दीक्षित होते. 




सुगम संगीत भारतीय या स्पर्धेमध्ये वाशिम व यवतमाळ जिल्ह्यातील बारा महाविद्यालय सहभागी झाली होती. या स्पर्धेचे समन्वयक डॉ संजय देव्हडे होते. 



वकृत्व स्पर्धेमध्ये वाशिम, यवतमाळ जिल्ह्यातील 39 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेचे समन्वयक डॉ. शिवाजी नागरे होते. स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी विविध विषयावर आपली मते व्यक्त केली. भारतीय समूह गायन स्पर्धेमध्ये यवतमाळ व बुलढाणा जिल्ह्यातील 192 विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर व लोकगीते गायन केली. यामध्ये ‘सारे जहाँ से अच्छा‘ , ‘ए मेरे वतन के लोगो‘ ,‘ जय जय महाराष्ट्र माझा‘ तथा शेतकरी गीते प्रमुख होती. या स्पर्धेच्या समन्वयक डॉ. आरती देशपांडे व कविता वरघट होत्या. 




स्थळचित्रण या स्पर्धेमध्ये एकूण 48 विद्यार्थी सहभागी झाले होते तर पोस्टर मेकिंग स्पर्धेमध्ये 68 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. 




आजच्या स्पर्धा करिता विद्यार्थी विकास विभागाचे समन्वयक डॉ. राजीव बोरकर, प्राचार्य जगदीश साबू, प्रा. रसिका वाजगे, प्रा. अभय वानखडे, प्रसिद्धी समन्वयक डॉ श्रीकृष्ण काकडे, विद्यापीठ संयोजन समितीचे डॉ. सावन देशमुख, डॉ. निखिलेश नलोडे, नेत्रा मानकर, डॉ सुरज हेरे, सीमा देशमुख, महाविद्यालय समन्वयक डॉ. ज्ञानसागर भोकरे, सुमेध कावळे, डॉ. निशा वराडे, डॉ. अरुण शेळके, पियुष नाल्हे, चंद्रशेखर कडू, प्रसन्न पांडे, मिलिंद शिरभाते, विवेक माने यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी परिश्रम घेत आहेत.









टिप्पण्या