S-T-Employees-strike-akola: राज्य परिवहन कर्मचारी संघटनेचा बेमुदत संप: एस टी बस सेवा ठप्प; सर्व सामान्य प्रवाश्याना फटका





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : गणेशोत्सव काही दिवसांवर आलेला असताना एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. प्रलंबित मागण्या घेवून राज्य परिवहन (एसटी) कर्मचारी संघटनेने बेमुदत संपाची हाक दिली आहे. महाराष्ट्र एसटी कामगार कृती समितीच्या मध्यमातून राज्यभर आज पासुन धरणे आंदोलनाला सुरुवात झाली आहे. यामुळे एस टी बस सेवा ठप्प झाल्याने सर्व सामान्य प्रवाश्याना याचा फटका बसत आहे. अकोल्यातील एस टी कर्मचारी यात सहभागी झाले असून, अकोला जिल्हयातील एस टी बस सेवा ठप्प झाल्याचे चित्र आहे.



एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक प्रश्नांसंदर्भात राज्य शासनाकडून 20 ऑगस्ट रोजी बैठक घेण्याचे शासनाने मान्य केले होते. मात्र अद्यापही शासनाने बैठकीचे नियोजन न केल्यामुळे महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समिती मार्फत संपूर्ण राज्यामध्ये एसटी कामगारांनी आंदोलन पुकारला आहे. या आंदोलनामुळे एस टी बस सेवा ठप्प झाली आहे.



अकोला जुने व नवीन बसस्थानक येथुन बस प्रवासी येवून वापस जात असल्याचे चित्र आहे. या बंदचा मोठा फटका सर्व सामान्य प्रवाशांना होत आहे.  



राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळावे, प्रलंबित महागाई भत्ता आणि फरक, वाढीव घरभाडे भत्ता आणि फरक, वेतनवाढीच्या दराचा फरक तसेच 4849 कोटी रुपयांमधील शिल्लक रकमेचे वाटप आणि नुकत्याच मुळ वेतनात जाहीर केलेल्या पाच हजार, चार हजार आणि अडीच हजार रुपयांऐवजी सरसकट 5000 रुपये मिळावेत, अशा मागण्या एसटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आल्या आहेत.





राज्य शासन जोपर्यंत प्रलंबित मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत हा आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार एसटी कर्मचाऱ्यांनी घेतला असल्याचे एस टी कर्मचारी नेते चंद्रशेखर तराटे यांनी सांगितले.





टिप्पण्या