भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक पिंजरची टीम वाॅटर रेस्क्यु क्राफ्ट आणी रेस्क्यु बोट,शोध व बचाव साहित्य आणी रुग्णवाहीकासह पुर्णा नदीपात्रात गांधीग्राम येथे सज्ज झाली आहे.
आज 1 सप्टेंबर 2024 जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या आदेशानुसार आरडीसी विजय पाटील यांच्या उपस्थितीत उप-विभागीय अधिकारी डाॅ. शरद जावळे यांचे मार्गदर्शनात अकोला तहसीलदार सुरेश कव्हळे ,नायब तहसीलदार महेंद्र कुमार आत्राम ,नायब तहसीलदार राहुल वसावे आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे ,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन टीमचे हरीहर निमकंडे, दिपक सदाफळे जिवरक्षक, प्रशांत सायरे, श्रावण भराडी, तलाठी सचिन चिकार, दत्तात्र्यय काळे, दिपक राऊत, सुनिल कल्ले यांचेसह मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख जिवरक्षक दिपक सदाफळे यांच्या नेतृत्वात त्यांचे सहकारी ज्ञानेश्वर म्हसाये, मयूर सळेदार, अंकुश सदाफळे, निलेश खंडारे, विकास सदांशिव, निखील बोबडे,आशिष गुगळे, विष्णु केवट, धिरज राऊत, शेखर केवट, अमर ठाकूर हे सज्ज झाले आहे. उद्याचा श्रावणातील पाचवा सोमवार असल्याने गांधीग्राम येथील पुर्णा नदीवर कावडधारी शिवभक्त जलाभिषेक नेण्यासाठी मोठ्याप्रमाणात येऊ शकतात. झालेल्या दमदार पावसामुळे पुर्णा नदीला मोठा पुर असल्याने नदी दुथळी भरुन वाहत आहे. याची दक्षता घेऊन पुर्व तयारीनिशी यंत्रणा तयार ठेवण्यात आली आहे. या ठीकाणी दहीहांडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार ठाकरे आणी पोलीस कर्मचारी मोठ्याप्रमाणात बंदोबस्त लावून आहेत अशी माहीती अकोला आपत्ती व्यवस्थपन अधिकारी संदीप साबळे यांनी दिली.
कावड यात्रनिमित्य गांधीग्राम व लाखपुरी पुर्णा नदी येथे बचाव पथके सज्ज
आज 1 सप्टेंबर रोजी कावड यात्रेच्या निमित्याने अकोला तालुक्यातील गांधीग्राम पुर्णा नदी येथे शोध व बचाव पथके सज्ज् ठेवण्यात आली आहेत. श्रावण महीण्यातील पाचव्या सोमवारी अकोला शहराचे अराध्यदैवत असलेल्या राजराजेश्वर मंदीरामध्ये जलाभिषेक करण्याचे अनुषंगाने मोठया प्रमाणात शिवभक्त गांधीग्राम येथील पुर्णा नदीवर जल आणण्यासाठी जातात. सदर शिवभक्ताच्या सुरक्षितेच्या अनुषंगाने पुर्णा नदीवर जिल्हा प्रशासनाचे वतीने शोध व बचाव पथके रात्रभर सज्ज ठेवण्यात आले आहेत. पुर्णा नदीमध्ये दोन बोटीसह बचाव पथक सदस्य सज्ज राहतील. तहसीलदार अकोला यांचे मार्गदर्शनामध्ये सदर पथके पुर्णा नदी येथे उपस्थित आहेत. तसेच गांधीग्राम येथे नायब तहसीलदार महेंद्र आत्राम, मंडळ अधिकारी दत्त काळे, प्रशांत सायरे , तलाठी सचिन चिकार ,दिपक राउत, सुनिल कल्ले , वंदे मातरम आपत्कालिन पथकाचे मनिष मेश्राम , राजकुमार जामनिक व पथक सदस्य , संत गाडगेबाबा आपत्कालिन पथकाचे दिपक सदाफळे व पथक सदस्य , मॉं चंडीका आपत्कालिन पथकाचे रणजित घोगरे व सदस्य उपस्थित आहेत.
कावड यात्रा व बैलपोळयाच्या अनुषंगाने आवश्यक दक्षता
घेण्याबाबत
भारतीय मौसम विभाग नागपुर यांचे 01 सप्टेंबरचे प्राप्त संदेशानुसार 01 ते 03 सप्टेंबर या दरम्यान विदर्भातील अकोला जिल्हयामध्ये अतिवृष्टीसह पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
तसेच सततच्या पाऊसामुळे अमरावती जिल्हयातील पुर्णा मध्यम, दगडपारवा, मोर्णा, पोपटखेड या प्रकल्पातुन पाण्याचा विसर्ग पुर्णा नदीमध्ये सुरु आहे. तसेच यापेक्षा अधिक पर्जन्यमान झाल्यास कोणत्याही क्षणी काटेपुर्णा प्रकल्पा मधुन पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो.
उपरोक्त संदेशाचे अनुषंगाने विशेषत: नदी नाला काठावरील गावांना पुराचा प्रभाव असलेल्या वस्तींना सतर्कतेच्या सुचना देण्यात येत आहेत.
नदी, नाले, तलाव, बंधारे यामध्ये मोठया प्रामाणात जलसाठा जमा होत असुन त्यामध्ये पोहण्याचे किंवा पुरस्थितीत बाहेर पडण्याचे नागरीकांनी धाडस करु नये.
जिल्हयातील सर्व प्रकल्प, नदी, नाले, तलाव व बंधारे मध्ये परीपुर्ण जलसाठा जमा झाला असुन विशेषताः नागरीकांनी बैलपोळा या दिवसी विशेष खबरदार घेण्यात यावी. नदीनाल्यामध्ये वाहून जाण्याची व तलाव बंधा-यामध्ये गाळात फसुन बढण्याची शक्यता आहे. त्यानुसार नागरीकांनी आवश्यक दक्षता घेण्यात यावी.
पुरस्थितीमध्ये रस्ता, पुलावरुन पाणी वाहत असल्यास आवश्यक दक्षता घ्यावी, असे जिल्हा प्रशासनाव्दारे आवाहन केले आहे.
काटेपूर्णा प्रकल्प
आज दि. १/०८/२०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता काटेपूर्णा नदीपात्रात सोडण्यात येत असलेला विसर्ग २५.४७ घ.मी./से वरून वाढवून १००.३२ घ.मी./से (३५४२ क्यूसेक्) एवढा करण्यात आला आहे. .पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे/कमी करणेबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल. तरी नदी काठच्या गावांतील नागरिकांनी सावध राहावे.
काटेपूर्णा प्रकल्प पूर नियंत्रण कक्ष
𝐊𝐚𝐭𝐞𝐩𝐮𝐫𝐧𝐚𝐏𝐫𝐨𝐣𝐞𝐜𝐭
जलाशय पातळी - 347.60 मीटर
उपयुक्त साठा - 83.571 द.ल.घ.मी.
टक्केवारी - 96.78 %
आजचा पाऊस - 04 मीमी
एकूण पाऊस - 579मीमी
4गेट प्रत्येकी 30 से.मी. सुरू आहेत
विसर्ग -- 100.32 घ.मी./से
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा