political-news-shiv-sena-ubt-: शासनाला जागे करण्यासाठी शिवसेनेने फुंकले रणशिंग ; शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी एक दिवसीय धरणे



शिवसेना उध्वव बाळासाहेब ठाकरे पक्ष आंदोलन




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांकरीता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने  मंगळवार 10 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्या संदर्भात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आमदार नितिन देशमुख, तथा जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांच्या नेतृत्वात एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले होते .

आज शेतकऱ्याची भीषण परिस्थिती झाली आहे. याला जबाबदार हे महाराष्ट्रातील शासन आहे. आजच्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी आपल्या जवळचे सर्व गहाण ठेवून कर्जबाजारी होऊन पेरणी केली, पूर्णमशागत केली, एवढी मेहनत करून आसमानी संकटांनी संपूर्णपणे शेतकरी घेरला  गेला आहे. दुसऱ्या बाजूने सुलतानी संकटाने घेरला. शेतकऱ्यांना अजून पर्यंत विम्याचे पैसे मिळाले नाही ओल्या दुष्काळाची परिस्थिती असून सुद्धा कोणत्याही प्रकारची शासनाने मदत केली नाही कोणत्याही प्रकारचा सर्वे झाला नाही.



आज रोजी सोयाबीनला शेंगा नाहीत. कुठे शेंगा आहेत तर दाणे भरले नाही. उडीद तुरीचे पीक जळून राहलेले आहे. कपाशी पिकाची वाढ खुंटलेली आहे. शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊन फवारणीचे औषध मारत आहे. परंतु पीक सुधारण्यामध्ये कोणताही फायदा होऊन राहिलेला नाही. खताचे, कीटकनाशकांचे, बियाण्याचे भाव आभाळाला टेकले असताना शासनाने प्रत्येक बाबीवर जीएसटी लावित आहे. त्यामुळे आधीच वाढलेले भाव आणखी वाढले. त्यामुळे शेतकरी अधिक कर्जबाजारी होत आहे. अशा या नापिकीमुळे व शासनाच्या धोरणामुळे जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचे आत्महत्या सत्र सुरूच आहे. हे सर्व रोखण्याची जबाबदारी शासनाची असताना शासन गेंड्याचे कातड अंगावर घेऊन  झोपलेल आहे. अशा ह्या शासनाला जागे करण्यासाठी  शिवसेनेने रणशिंग फुंकले आहे.


अशा आहेत  प्रमुख मागण्या सह इतर मागण्या 


१) अकोला जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, 

२)शेतकऱ्यानां तात्काळ २५ %

पिक विमा भरपाई देण्यात यावी,

३)सोयाबीनला ७ हजार हमी भाव देण्यात यावा.

४)कापसाला किमान १० हजार भाव मिळालाच पाहिजे.

५) मागील 2023-24 वर्षाचे अतिवृष्टी व भांवातराचे पैसे लवकर जमा करण्यात यावे.

६) पिकांवर अमर वेल आल्यामुळे पिकांचे झालेले नुकसान नैसर्गिक आपत्ती गृहीत धरून मदत देण्यात यावी.याकरीता हे एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले.



या आंदोलनास लोकसभा समन्वयक दाळू गुरुजी, माजी आमदार संजय गांवडे, हरिदास भदे, सहसंपर्कप्रमुख सेवक राम ताथोड, निवासी उपजिल्हाप्रमुख अतुल पवनीकर, उपजिल्हाप्रमुख गजानन बोराळे, उपजिल्हाप्रमुख विकास पागृत, योगेश्वर वानखडे, दिलीप बोचे, उमेश जाधव, तालुकाप्रमुख नितिन ताथोड, ज्ञानदेव गांवडे, एन म्हसने, गजानन मनतकार, अजय गावंडे, शहरप्रमुख राहूल कराळे, मनोज खंडारे,विवेक खारोडे,अमोल पालेकर, युवासेना जिल्हाध्यक्ष अभि खुमकर, परनाटे, प्रदीप गुरुखुद्दे, रामप्रभु तराळे, शाम गांवडे, अजय गांवडे , शिवा मोहोड, गोपाल विखे, प्रकाश डवले,श्याम गावंडे, गोपाल भटकर, संजय अढाऊ,संदीप सरदार, डॉ. बोबडे, डॉ. प्रशांत अढाऊ, नितिन ताकवाले, सुरेद्र विसपुते, अनिल परचुरे, अनिल निकामे, गजानन इंगळे,अश्विन कपले, विशाल घरडे,भास्कर अंभोरे, मुन्ना भाकरे, सरिता वाकोडे, वर्षा वझीरे सह जिल्ह्यातील शेकडो शेतकरी, शिवसैनिक  पदाधिकारी सहभागी झाले होते.

टिप्पण्या