Political-news-BJP-UBT-akl: आमदार देशमुख माझे मित्र आहेत - राधाकृष्ण विखे पाटील यांचा टोला





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: मतदारसंघातील प्रश्नांवरून आमदार नितीन देशमुख हे भावनिक झाले असतील. ते माझे मित्र आहेत, असा टोला भाजपा नेते तथा महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आणि अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदार नितीन देशमुख (शिवसेना उबाठा) यांना लगावला. 




पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. मात्र त्यांचा जिल्ह्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असून जिल्हा वाऱ्यावर सोडला असल्याचा आरोप करीत जर पालकमंत्री 23 तारखे पर्यंत आले नाहीतर आपण 24 तारखेला बेपत्ता पालकमंत्री यांना शोधण्यासाठी अहमदनगर येथे जावून पालखीत बसवून घेवून येवू, असा इशारा आमदार देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिला होता. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदार देशमुख यांना टोला लगावला.


अकोला येथील कृषी विद्यापीठात आयोजित शिवार फेरी समारोपाच्या कार्यक्रमाला आले असता राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते.






राज्य सरकारची प्रामाणिक भूमिका ही कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा, धनगर या समाजाला आरक्षण देण्याची आहे, मात्र सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. मात्र विरोधकांची  भूमिका दुटप्पी असल्याचं महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हंटलं. 



सुजय विखे पाटील यांनी संगमनेर मधून लढण्याची इच्छा व्यक्त केली, यावर विखे पाटील यांनी पक्ष जो निर्णय घेईल ते मान्य असेल म्हणत निर्णय पक्षावर सोडला. 



अमित ठाकरे यांचं नगर मध्ये लागलेल्या बॅनर वरून विखे पाटील यांनी कोणी निवडणूक का लढावी कुठून लढावी या ज्याचा त्याचा प्रश्न असून अमित ठाकरे नगर मधून का निवडणूक लढत आहे हे त्यांनाच विचारावं असं विखे पाटील म्हणाले.



महायुतीतून बाहेर पडलेल्या बच्चू कडू यांची त्यांनी स्तुती केली. बच्चु कडू प्रत्येकवेळी कोणाला धरत असतात तर कोणाला सोडत असतात. सरकार कोणत्याही पक्षाचे असो मात्र बच्चू कडू यांना कोणता फायदा होणार हे पाहण महत्त्वाचं असल्याचं विखे पाटील म्हणाले. 





कांदा निर्यातीवर बंदी उठवल्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला असल्याचं ही ते म्हणाले. तर जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्यास आम्ही ही कामाला लागू असल्याचं ही ते म्हणाले.




दरम्यान आज विखे पाटील आणि आमदार देशमुख यांनी शासकिय विश्रामगृह येथे भेटून जिल्हयातील विविध प्रश्नांवर चर्चा केली.


टिप्पण्या