- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
pitru-moksha-shiv-mahapuran: बाल कथाकार कृष्णा दुबे यांच्या वाणीत पितृ मोक्ष शिव महापुराण कथाचे आयोजन
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: पितृपक्षात भाविकांना शाश्वत सुखाची अनुभूती व्हावी, भागवत प्राप्तीचा मार्ग सुकर व्हावा परिवारातील कलह ,क्लेश आदी बाबींचे निराकरण व्हावे व मनुष्य जीवनातील विविध समस्या नष्ट व्हाव्यात. या उदात्त हेतूने बुधवार 18 ते 24 सप्टेंबर पर्यंत नित्य दुपारी 1 ते 4 वाजेपर्यंत रिंग रोड, कोलखेड परिसरातील जानोरकर मंगल कार्यालयात पितृ मोक्ष शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे.
या संगीतमय कथेत आंतरराष्ट्रीय भागवत भूषण, बाल व्यास म्हणून ख्याती प्राप्त असणारे बालकथाकार कृष्णा दुबे हे संगीतमय पितृ मोक्ष शिव महापुराण कथा सादर करणार आहेत. राधाकृष्ण सेवा समिती म्हैसपूर व यजमान राजेश गंगाराम सोनोने तथा वर्षा राजेश सोनोने यांच्या माध्यमातून हा अध्यात्मिक उपक्रम साकार करण्यात आला आहे.
या कथा उत्सवात सातही दिवस भक्तांसाठी नांदी मोक्ष श्राद पूजन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या पूजनात या दिवसात तीन पिढ्यांचा उद्धार होत असल्याचे धर्मात सांगण्यात आले आहे .या पूजनाने इडा पिडा, संतती समस्या, संपत्ती व प्रपंच आदी समस्या नष्ट होत असल्याचे सांगण्यात येते.
पूजा विधि सकाळी 9 ते सकाळी 11 वा दरम्यान व कथा दुपारी 1 ते 4 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या पूजा विधी व कथा प्रवचनाचा समस्त महिला पुरुष भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक राजेश गंगाराम सोनोने व वर्षा सोनोने समवेत राधाकृष्ण सेवा समिती म्हैसपूरच्या वतीने करण्यात आले आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा