mild-tremors-amravati-akola: अमरावती व अकोला जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले

file image 




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: नॅशनल सेंटर ऑफ सेस्‍मोलॉजी या संकेत स्‍थळावरुन प्राप्‍त माहीतीनुसार आज 30 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 1.37 वाजता दरम्‍यान अमरावती व अकोला जिल्‍हयामध्‍ये  भुकंपाचे सौम्‍य धक्‍के जाणवले आहेत. 



भूकंपाचे केंद्र अमरावती जिल्‍हयातील चिखलदरा तालुक्‍यातील अमझरी व टेटु या गावाच्‍या  दरम्‍यान असुन रिश्‍टर स्‍केल वर याची नोंद 4.2 आहे. Lat.21.44 N, Long 77.34 E  आहे. 

       

याबाबत अकोट तहसीलदार यांचेकडुन प्राप्‍त माहीतीनुसार मौजे रुधाडी, खिरकुंड ,प्रिंपी जैनपुर या गावामध्‍ये सौम्‍य धक्‍के जाणवल्‍याचे गावातील नागरीकांचे म्‍हणणे असुन सदर ठिकाणी कोणतीही जिवीत व वित्‍तहानी नाही. 



तहसीलदार तेल्‍हारा यांचे कडुन प्राप्‍त  माहीतीनुसार तेल्‍हारा तालुक्‍यातील हिवरखेड येथे सौम्‍य  धक्‍के  जाणवले आहेत.

टिप्पण्या