- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
howrah-mumbai-weekly-rail-a: हावडा - मुंबई साप्ताहिक रद्द; मेल, आझादहिंद परावर्तित मार्गाहून धावणार, अकोला मार्ग धावणाऱ्या 10 गाड्या प्रभावित
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
file photo
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या बिलासपूर विभागातील खरसिया रायगड तिसऱ्या चौथ्या विद्युत लाइन सेक्शनमध्ये भूपदेवपूर स्टेशनवर चौथी लाइन कनेक्टिव्हिटीसाठी 10 ते 22 सप्टेंबर दरम्यान प्री आणि नॉन इंटरलॉकिंग काम करण्यात येत आहे. यामुळे काही गाड्या रद्द केल्या जाणार आहेत आणि काही गाड्या परावर्तित मार्ग धावतील. या कालावधीत प्रवाशांना असुविधा होणार असली तरी काम पूर्ण झाल्यानंतर गाड्यांचा वेग वाढेल आणि प्रवासाचा वेळ कमी होईल. या कामामुळे अकोला मार्ग धावणाऱ्या 10 गाड्या प्रभावित झाल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
रद्द गाड्या
20822 सांतरागाछी - पुणे हमसफर 14 आणि 21 सप्टेंबर 2024 रोजी रद्द
20821 पुणे - सांतरागाछी हमसफर 16 आणि 23 सप्टेंबर 2024 रोजी रद्द
12870 हावडा - मुंबई साप्ताहिक 13 आणि 20 सप्टेंबर 2024 रोजी रद्द
12869 मुंबई - हावडा साप्ताहिक 15 आणि 22 सप्टेंबर 2024 रोजी रद्द
परावर्तित मार्ग धावणाऱ्या गाड्या
1. 12810/12809 हावडा-मुंबई-हावडा मेल आणि 12130/12129 आझाद हिंद एक्सप्रेस: 10 ते 22 सप्टेंबर 2024 दरम्यान झारसुगुडा-तितलागढ-रायपूर मार्गावरून धावेल.
2. 12880 भुवनेश्वर-एलटीटी: 9, 12, 16, आणि 19 सप्टेंबर 2024 रोजी झारसुगुडा-तितलागढ-रायपूर मार्गावरून धावेल.
3. 12879 एलटीटी-भुवनेश्वर एक्सप्रेस: 11, 14, 18, आणि 21 सप्टेंबर 2024 रोजी झारसुगुडा-तितलागढ-रायपूर मार्गावरून धावेल.
रेल्वे प्रवाशांनी आपली यात्रा आधीच नियोजित करून या बदलांचा विचार करावा. मार्ग बदलल्यामुळे प्रवासाच्या वेळेत वाढ होण्याची शक्यता आहे. रेल्वे प्रशासन प्रवाशांना होणारी असुविधा कमी करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. या कामानंतर भविष्यात प्रवाशांना उत्तम सेवा मिळतील. प्रवाशांनी प्रवासापूर्वी रेल्वेची अधिकृत वेबसाइट किंवा कॉल सेंटरवरून ताज्या माहितीसाठी तपासणी करावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा