honoring-gopikishan-bajoria-in- legislature: गोपीकिशन बाजोरिया यांचा विधिमंडळात सन्मान; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान




भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला:  राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेतर्फे सन 2021-22 या वर्षाचा महाराष्ट्र विधान परिषदेमधील उत्कृष्ट भाषण पुरस्कारासाठी माजी आमदार तथा शिवसेनेचे अकोला जिल्हा निरीक्षक गोपीकिशन बाजोरिया यांची निवड करण्यात आली असून,  हा पुरस्कार मंगळवार  3 सप्टेंबर रोजी विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 


महाराष्ट्र विधान मंडळातील सदस्यांना गेल्या सहा वर्षातील उत्कृष्ट संसद पटू व उत्कृष्ट भाषण पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत. त्यामध्ये सन 2021-22 या वर्षाकरिता महाराष्ट्र विधान परिषदेतील उत्कृष्ट भाषण या पुरस्कारासाठी माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांची निवड करण्यात आली होती. याबाबतचे पत्र महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय तथा सचिव राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेचे सचिव जितेंद्र भोळे यांनी दिल्यानंतर मंगळवारी दुपारी 3 वाजता विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात राष्ट्रपतींच्या शुभहस्ते हा पुरस्कार गोपीकिशन बाजोरिया स्वीकारला आहे. 





या पुरस्कारासाठी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी गोपीकिशन बाजोरिया यांचे या पुरस्कारासाठी अभिनंदन केले आहे. आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात त्यांनी अकोला, बुलढाणा, वाशिम तीनही जिल्ह्यातील विविध मुद्दे व समस्या विधान परिषदेच्या सभागृहात अगदी परिणामकारकपणे मांडल्या. तीनही जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना व या संस्थांमधील प्रतिनिधींना तसेच सामान्य नागरिकांना आपल्या स्पष्ट व कणखर भाषणातून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मुद्देसूद, अभ्यासू, कणखर व स्पष्ट भाषण शैलीमुळे सरकारला त्यांच्या मुद्यांची दखल घ्यावी लागली. याच उत्कृष्ट भाषण शैलीसाठी त्यांना राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेतर्फे सन 2021-22 करिता महाराष्ट्र विधान परिषद उत्कृष्ट भाषण पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्कारासाठी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांसह विविध राजकीय नेते व पदाधिकाऱ्यांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.


प्रभावी कारकीर्द



गोपिकीशन बाजोरिया यांची राजकीय कारकीर्द अतिशय प्रभावी राहिली आहे, साडेबारा वर्ष नगरसेवक राहिल्यानंतर ते स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून महाराष्ट्र विधान परिषदेवर निवडून गेले,त्यांनी सुमारे 18 वर्ष आमदार म्हणून उत्तम कामगिरी केली. ते या काळात हक्कभंग समिती,विनंती अर्ज समिती या विधिमंडळ समित्यांवर होते,तसेच अनेकवेळा त्यांनी विधानपरिषद तालिका सभापती पदाचा कारभार सुद्धा उत्तमरीत्या सांभाळला आहे. राजस्थानी समाज,अग्रवाल संमेलन अश्या सामाजिक संस्थांमध्येही त्यांनी कार्य करून डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कार्यकारी परिषद,संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ कार्यकारी परिषदेवर दायित्व निभावले. त्यांनी वाशिम अर्बन बँक आणि सन्मित्र बँक यासारख्या वित्तीय संस्थांवर आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे.


षडयंत्र करून पराभव


स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात काम,संपर्क आणि विकास या त्रिसूत्रीचा वापर करीत त्यांनी आपला ठसा उमटवला होता,मात्र मागील काळात काही व्यवसाय बंधू आणि काही समाज बंधूनी  " विजय " समोर दाखवत राजकीय षडयंत्र रचून त्यांना बेसावध ठेवत  पराभव घडवून आणला हे शल्य अजूनही असंख्य जनतेला आहे.


 हा जनतेचा सन्मान 



राष्ट्रकुल संसदीय मंडळाचा हा पुरस्कार मिळणे हा आजवर ज्यांचा आवाज बनून मी सभागृहात काम केले त्या अकोला,बुलडाणा आणि वाशीम या तिन्ही जिल्ह्यातील लोकांचा हा सन्मान आहे. कोणत्याही सभागृहात लोकाचा  आवाज बुलंद करावा लागतो. माझ्या वाट्याला आलेले प्रत्येक कार्य मी अतिशय नेटाने आणि लोकांच्या प्रति दायित्व समजून केले आहे. त्याचे हे फळ असल्याची प्रतिकिया गोपीकिशन बाजोरिया यांनी व्यक्त केली.

टिप्पण्या