- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
gang-mobile-thieves-jharkhand: झारखंड मधील मोबाईल चोरट्यांची टोळी महाराष्ट्रात गणेश उत्सवात सक्रिय; अकोला रेल्वे पोलिसांनी तिघांना ठोकल्या बेड्या
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
ठळक मुद्दा
झारखंड गैंगकडून 7,35,000/- रूपयांचे चोरलेले मोबाईल हस्तगत करण्यात रेल्वे पोलिसांना मोठे यश
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : सणासुदीच्या दिवसात सध्या मोबाईल चोरटे अधिक सक्रिय झाले असून गर्दीचा फायदा हे चोरटे घेत आहेत.अकोल्यात गणेश स्थापनेच्या दिवशी मोबाईल चोरट्यांनी मोठ्या संख्येत मोबाईल लंपास केले.
अकोला रेल्वे पोलिसांनी या मोबाईल चोरांच्या टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. रेल्वे पोलिसांनी संशयितरित्या फिरणाऱ्या एका आरोपीची चौकशी केली असता त्याच्या आणि त्याच्या साथीदारांकडे साडेसात लाखांचे चोरीचे एकूण 19 महागडे मोबाईल सापडून आले. या टोळीत एका अपलवयीन मुलाचाही समावेश आहे. झारखंड राज्यातील ही टोळी सध्या महाराष्ट्रात गणेश उत्सवात मोबाईल चोरी करिता सक्रिय आहे. यापासून नागरिकांनी सतर्क रहावे ,असे आवाहन अर्चना घावडे , पोलीस ठाणेदार , अकोला रेल्वे पोलीस यांनी केले आहे.
सध्या गणेशोत्सव निमीत्त नागरीकांची खरेदीसाठी होणारी गर्दी हेरून झारखंड येथील काही गुन्हेगार चोरी करण्याच्या उद्देशाने अकोला शहर आणि रेल्वे स्टेशन परिसरात आले असल्याची माहीती अकोला रेल्वे पोलीसांना मिळाली होती. त्याप्रमाणे 8 सप्टेंबर रोजी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी अंमलदार रेल्वे स्टेशन परिसरात गुन्हेगार वॉच पेट्रोलिंग करत असताना, एक संशयित आरोपी कन्हैयाकुमार उमेश रविदास,( वय 24 वर्षे) हा रेल्वे स्टेशनवर मिळून आला. पोलिसांनी त्यास ताब्यात घेवून त्याच्याकडे विचारपूस केली. तो झारखंड येथील रहीवाशी असून चोरी करण्याच्या उद्देशाने त्याच्या साथीदारांसह अकोला शहरात आला असल्याचे त्याने सांगितले. त्याच्याकडे सखोल तपास करून शिताफीने त्याचा आणखी एक साथीदार गब्बर नोनिया मोहार चौधरी, (वय 30 वर्षे) व अन्य एक (15 वर्षे वयाचा) अल्पवयीन मुलगा (सर्व रा. साहेबगंज, झारखंड) यांना ताब्यात घेतले. ते तिघेजण गणेशोत्सवा दरम्यान होणा-या नागरीकांच्या गर्दीचा फायदा घेवून चोरी करण्याच्या उद्देशाने पाच सहा दिवसांपासून संत कबीर नगर, आपातापा रोड, अकोला येथे भाडेतत्वावर खोली घेवून राहत असल्याचे दिसून आले. त्यांच्याकडे अकोला रेल्वे स्टेशन, अकोला शहर, बार्शीटाकळी, अमरावती अशा वेगवेगळया ठिकाणावरून चोरी केलेले एकूण 19 महागडे मोबाईल, त्याची एकूण किंमत 7,35,000/- रूपये अशा किंमतीचे मोबाईल हस्तगत करण्यात पोलीसांना यश प्राप्त झाले आहे.
पोलीस अधिक्षक डॉ. अक्षय शिंदे, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, लोहमार्ग अकोला, संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे पोलीस स्टेशन, अकोला प्रभारी अधिकारी, सहायक पोलीस निरीक्षक, अर्चना गाढवे, सहायक पोलीस निरीक्षक पंकज ढोके, सहायक फौजदार सतिश चव्हाण यांच्यासह संतोष वडगीरे, सुशिल सांगळे, विजय रेवेकर, पो.शि. इरफान पठाण, कपिल गवई, विजय शेगावकर, तुषार गोंगे यांनी ही कामगिरी केली आहे.
नागरिकांनी रेल्वे प्रवासादरम्यान तसेच बाजारामध्ये खरेदी करतेवेळी होणा-या गर्दीमध्ये आपल्या मुल्यवान वस्तू सांभाळून ठेवाव्यात. कोणी संशयित व्यक्ती आढळल्यास त्याबाबत तात्काळ स्थानिक पोलीसांना माहीती दयावी. तसेच रेल्वे पोलिसांनी जप्त केलेल्या काही मोबाईलला पॅटर्न लॉक असल्याने मोबाईल मालकाबरोबर संपर्क करण्यास उशीर होणार असून, मागील पाच सहा दिवसांपासून ज्या नागरिकांचे मोबाईल चोरीस गेलेले आहेत त्यांनी रेल्वे पोलीसांशी संपर्क करून आपला मोबाईल घेवून जाणे, असे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा