ganesh-mandal-adopt-patient: विप्र युवा वाहिनी गणेश मंडळानी दहा क्षयरुग्णांना घेतले दत्तक




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: अकोला महानगरपालीका राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम शहर क्षयरोग कार्यालयाच्या वतीने प्रधानमंत्री टि.बी. मुक्त अभियान अंतर्गत क्षयरुग्णांना दत्तक घेऊन किमान सहा महिने कोरडी धान्याची किट्स  देवून निक्षय मित्र म्हणुन आपण क्षयरुग्णांना मदत करु शकतात या अनुषंगाने 9 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर 2024 या दरम्यान निक्षय मित्र जोडणी अभियान सुरु आहे. यामध्ये विप्र युवा वाहिनी गणेश मंडळाने मनपा क्षेत्रातील 5 आणि ग्रामिण मधील 5 असे एकुण 10 क्षयरुग्ण दत्तक घेतले असुन त्यांना 6 महिन्याकरीता कोरडा आहार किट पुरविले जाणार आहे. मागील दोन वर्षापासून हा नाविण्यापुर्ण उपक्रम मंडळाव्दारे राबविला जात आहे. 



प्रधानमंत्री टीबी. मुक्त अभियानाअंतर्गत जास्तीत जास्त लोंकानी सहकार्य करावे असे आवाहन यावेळेस अकोल्‍याचे खासदार अनुप धोत्रे तर अकोला पोलीस अधिक्षक बच्चन सिंग यांनी स्टॉलला भेट देऊन आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.





विप्र युवा वाहिनी गणेश मंडळ तर्फे 10 क्षयरुग्णांना कोरडी धान्याची किट्स उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत यावेळेस वाटप करण्यात आली. 


डॉ मनिष शर्मा, जिल्हा क्षयरोग अधिकारी, डॉ निखिल लहाने, शहर क्षयरोग अधिकारी, डॉ. उमेश पद्मने, वसंत उन्हाळे जिल्हा समन्वयक तर ॲड. सौरभ शर्मा, सुमित शर्मा, अरुण शर्मा, विधुर शर्मा, गोपाल शर्मा, अश्विन शर्मा मंडळाचे सक्रिय सदस्यामार्फत राबविण्यात आले. 



या अभियांन अंतर्गत अकोला जिल्हातील सर्वत्र नागरीक, संस्था, ट्रस्ट यांनी निक्षय मित्र बनवून आपण सुध्दा या प्रधानमंत्री टिबी मुक्त अभियान मध्ये सहभागी व्हावे. तसेच शासनाने 2025 पर्यत टी.बी. मुक्त भारत बनविण्याचे धोरण अवलंबिले आहे. या अनुषंगाने प्रधानमंत्री टिबी मुक्त भारत अभियान राबविले जात आहे. 





क्षयरुग्णांना सामुदायिक सहाय्य हा आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालय एक भाग असुन ज्या व्दारे क्षयरुग्णांना अतिरिक्त सहाय्य दिले जाते. जिल्हातील जास्तीत जास्त व्यक्तींनी निक्षय मित्र होऊन क्षयरुग्णांना दत्तक घ्यावे, असे आवाहन मनपा  वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनुप चौधरी यांनी केले आहे.

टिप्पण्या