flood-in-Sukoda-village-akola: सुकोडा गावातील नालाल्या पूर; 55 वर्षीय इसम पाण्याच्या प्रवाहात गेला वाहून

 




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : अकोला जिल्ह्यात काल पासून जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे अनेक छोटे मोठे नदी नाले ओसंडून वाहत आहे. 




अकोला शहरालगत असलेल्या अकोट फाईल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुकोडा या गावातील नाला कालपासून ओसंडून वाहत आहे. आज सकाळी 6 च्या सुमारास गावातील 55 वर्षीय दशरथ गायकवाड हे कामावरून परतताना पुराच्या या पाण्याजवळ गेले असता पाय घसरुन पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. 





या घटनेची माहिती मिळताच डाबकी रोड पोलीस आणि अकोट फाईल पोलीस दोन्हीही घटनास्थळावर दाखल झाले. यानंतर शोध व बचाव पथकाला पाचारण करण्यात आलं असून बचाव पथक आता या वाहून गेलेल्या इसमाचा शोध घेत आहे.



वंदे मातरम् आपत्कालीन शोध व बचाव पथकाने सुमारे 7 तासाच्या अथक परिश्रमानंतर भोंड गावाजवळ पाण्यात वाहून गेलेल्या व्यक्तीला शोधून काढल.

टिप्पण्या