- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
मुर्तीजापुर (अकोला) : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसह शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या उपस्थितीत आज मूर्तिजापूर येथे आक्रोश दहीहंडी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे रवि राठी शेकडो शेतकऱ्यांसह सहभागी झाले.
मुर्तीजापुर बार्शीटाकळी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा सोयाबीनला भाव द्या, विमा कंपनीच्या प्रतिनिधी वर गुन्हे दाखल करा, पिक पाहण्याची अट रद्द करा अशा विविध मागण्यांसह शेतकरी संघर्ष समितीतर्फे सर्व पक्षाचे झेंडे बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या मागणीसाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
मोर्चाचे नेतृत्व शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या उपस्थितीत जुन्या कॉटन मार्केट येथून सुरू झाला. या दहीहंडी मोर्चामध्ये आपल्या शेकडो समर्थकांसह शेतकऱ्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश संघटक सचिव रवी राठी यांनी सहभाग घेतला होता. शेतकरी शेतमजुरांसाठी लढणारे शेतकरी पुत्र रवी राठी यांच्या सहभागाने या संपूर्ण मोर्चाचे लक्ष वेधले होते.
मुर्तीजापुर बार्शीटाकळी मतदारसंघात अनेक पक्षाचे नेते आहेत. मात्र या मोर्चाला फक्त आणि फक्त राजकीय पक्षातून रवी राठी यांची उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधली होती. रविकांत तुपकर यांच्या उपस्थितीत, समाजसेवक रवी राठी सह उपविभागीय अधिकारी मुर्तीजापुर यांना शेतकऱ्यांच्या समस्येबाबत निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी शेतकरी नेते गजानन अहमदाबादकर, कृष्णा गावंडे, चंद्रशेखर गवळी, नितीन गावंडे सह हजारो शेतकरी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा