भारतीय अलंकार न्यूज 24
ॲड.नीलिमा शिंगणे जगड
अकोला: जगाला मानवता आणि बंधुत्वाचा संदेश देणारे व इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर (स.अ.) यांच्या जयंती निमित्त जश्ने ईद ए मिलादुन्नबी जुलूस आज गुरुवार 19 सप्टेंबरला अकोला शहरातून मोठ्या उत्साहात निघाला.
सामाजिक सद्भावनेचे दर्शन
या जुलूसमध्ये सामाजिक सद्भावनेचे दर्शन घडले. ईद ए मिलादुन्नबीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्याची शहरात परंपरा आहे. ही मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गांवरून निघून शांततेत पार पडली. शहरासह जिल्ह्यातील नागरिकांनी व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या मिरवणुकीत सहभाग घेतला. जुलूसचे सार्वजनिक गणेश उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले.
ईद-मिलादीन्नबी जूलूसवर केला फूलांचा वर्षाव

अनंत चर्तुदशी व दुसर्या दिवशी श्रीगणेश विर्सजन मिरवणुकीवर महाराष्ट्रात अकोट, शेगाव, जळगाव जामोदसह राज्यात काही ठिकाणी काही असामाजिक उपद्रवी लोकांनी दगडफेक करून राज्यातील सामजिक वातावरण बिघडविण्याचा व शांती सदभावाला नख लावण्याचे कृत्य केले आहे. या निंदनीय घटनेचा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने तीव्र शब्दात निषेध केला आहे. मात्र शांती, अमन, आपसी सदभाव कायम राहो, या हेतुने अकोला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आज गांधी चौक येथे ईद- मिलादुन्नबीच्या जूलूसवर फूलांचा वर्षाव केला. जूलूस कमेटीचे अध्यक्ष हाजी मुदाम सह त्यांच्या सहकार्यांचे स्वागत केले. जूलूसवर 1000 किलो फूलांचा वर्षाव करून गणेशोत्सव मंडळाने त्या दगडफेकीच्या निदंनीय घटनेला शांती सदभावाचे उत्तर-संदेशच दिला आहे. कारण आपसी सदभावानेच राष्ट्राचा विकास होऊ शकतो, असा विश्वास आहे. दगडफेक सारख्या घटनेने फक्त दुषित वातावरण होवून हिंदू मुस्लिमसह सर्वाचेच नुकसानच होते,असे यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
ईद जूलूसवर फूलांचा वर्षाव करते वेळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष ॲड. मोतीसिंह मोहता, कार्याध्यक्ष हरीश आलीमचंदानी, महासचिव सिद्धार्थ शर्मा, ॲड. सुभाष ठाकूर, विजय जयपिल्ले, विजय तिवारी,मनोज खंडेलवाल, नीरज शहा, मनोज साहू, सतोष पांडे, मनीष हिवराळे, श्रीहरी डांगे, दिलीप खत्री, ॲड.यश मोहता, संजय गोटाफडे, अमोल बछेर, विशाल यादव, गूड्डू शर्मा, कमल शर्मा, मनोज हेडावू, मनीष खर्चे आदी उपस्थित होते.
सर्वानुमते निर्णय
यंदा सोमवार 16 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद सण साजरा झाला. या सणाच्या दिवशी शहरात मोठी मिरवणूक काढण्यात येते. परंतु यावर्षी 17 सप्टेंबर गणेश चतुर्दशी असल्याने गणेश विसर्जन होते. त्या निम्मित परंपरेनुसार मिरवणुक काढण्यात येते. शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी हिंदु मुस्लीम एकता समितीने सर्वानुमते ईद-ए-मिलादुन्नबीची मिरवणूक गुरुवार 19 सप्टेंबर रोजी काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार आज गुरुवारी शहरातून ईद-ए-मिलादुन्नबीची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
जुलूस मार्गावर हिरवा पताका
कच्छी मशीद मोहम्मद अली चौक येथून प्रारंभ झालेला जुलूस फतेह चौक, ओपन थिएटर, गांधी मार्ग, जय हिंद चौक, अगरवेस, दगडी पूल, लकड गंज, अकोट स्टॅन्ड या मार्गाने मोहम्मद अली मार्गावर पोहोचला. जुलूस मार्गावर सर्वत्र सजावट करण्यात आली होती. स्वागतासाठी जुलूस मार्गावर पताका लावण्यात आल्या होत्या. हजारो नागरिकांनी मिरवणुकीत सहभाग घेतला. शहरासह जिल्ह्यातील नागरिकांनीसुद्धा या मिरवणुकीत सहभाग घेतला.
चोख बंदोबस्त
जनहितार्थ जारी: अकोला पोलीस
ईद ए मिलादुन्नबी जुलूस शांततेत व धार्मिक सलोखा राखत पार पडावी, याकरिता जिल्हा पोलीस प्रशासनानेही चोख बंदोबस्त ठेवला होता. मिरवणूक मार्गावरील प्रमुख चौकांसह जागोजागी पोलीस व गृहरक्षक दलाचे जवान तैनात होते. त्यासोबतच ठिकठिकाणी कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली होती. मार्गावर ठिकठिकाणी मिठाई, पाणी, फळे, शरबत, पोहे, पेंडखजूर याची व्यवस्था करण्यात आली होती. शहरातील विविध राजकीय मान्यवरांनी देखील जुलूस मध्ये सहभाग घेतला. शांततेत व उत्साहात मिरवणूक पार पडली.
जुलूस प्रारंभ
मुफ्ती-ए-आझम गुलाम मुस्तफा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या मिरवणुकीचे नेतृत्व समितीचे अध्यक्ष हाजी मेहमूद खान उर्फ मुदाम भाई यांनी केले. शहजाद-ए-मुफ्ती आझम ब्रार मोहम्मद अर्शद रझा यांच्या प्रमुख उपस्थितीत गुलाम मुस्तफा, कच्छी मशिदीचे मुफ्ती सादिक साहेब, मिरवणूक समितीचे अध्यक्ष हाजी मेहमूद खान उर्फ मुदाम भाई यांनी हिरवी झेंडी दाखवून जुलूसला रवाना केले. जावेद झकारिया यांनी मंच संचालन केले.
‘मुऐ मुबारक की जियारत’ कच्छी मस्जिद मध्ये
जश्ने ईद मिलादुन्नबी जुलूस निम्मित अकोला शहरातील कच्छी मस्जिद मधे पैगम्बर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांची मुऐ मुबारक ची जियारत आज गुरुवार 19 सप्टेंबर ला सकाळी 10 ते 3 वाजे पर्यांत केल्या गेली. मागील 56 वर्षापासून ही जियारत अकोलातील कच्छी मस्जिद मध्ये कऱण्यात येते. तसेच "हुजूर" इमाम ऐ अली मक़ाम, आणि सरकार सैयदना इमाम ए हसन व सरकार सैयदना इमाम ए हुसैन मुऐ मुबारक ची सुध्दा जियारत कऱण्यात आली. कच्छी मस्जिदचे अध्यक्ष जावेद ज़कारिया, व्यवस्थापक एज़ाज़ सूर्या, सहायक व्यवस्थापक हाजी यासीन बचाव, सदस्य हाजी फारूक भुरानी, हाजी हनीफ मलक, हाजी इम्तियाज गणोदवाला, वाहिद मुसानी, गुड्डू मेमन, सलीम गाज़ी यांनी जियारत च्या यशस्वितेसाठी प्रयत्न केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा