- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
chandrashekhar-bawankule-bj: 70 ते 75 टक्के जागांवर महायुतीच एकमत झालं- चंद्रशेखर बावनकुळे यांचे सूचक वक्तव्य
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
पत्रकार परिषदेत संबोधित करताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे. यावेळी आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे उपास्थित होते.
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : महायुतीच्या 100 जागांचे वाटप येत्या काही दिवसात होणार असल्याचे संकेत महायुतीच्या नेत्यांनी दिले आहेत. मात्र चांगले उमेदवार आहेत, त्याठिकाणी कुणीही दावा करणार नसून, जवळपास 70 ते 75 टक्के जागांवर महायुतीच एकमत झालं असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी विधानसभा निवडणूक संदर्भात सूचक वक्तव्य केले. ते अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
सध्याचे विद्यमान आमदार यांनाही बदलण्याचे संकेत यावेळी बावनकुळे यांनी दिले. हिट अँड रन प्रकरणात आपण प्रामाणिकपणे आतापर्यंत पोलिसांना फोन केला नसून, माझ्या वक्तव्यावर पोलिसांवर दबाव येणार नाही तर आपण केंद्रीय गृह मंत्री सोबत असताना सुद्धा त्यांनाही काही बोललो नाही. म्हणून या प्रकरणात जो दोषी असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे असं ही ते म्हणाले. बुरखा वाटप संदर्भात बावनकुळे म्हणाले की, महायुतीतील घटक पक्षांची भूमिका वेगवेगळी असली तरी आमचा उद्देश नरेंद्र मोदी यांना 2029 पर्यंत सहकार्य करण्याचा आहे. तर महाविकास आघाडीची सत्ता आल्यास महाविकास आघाडी सर्व योजना बंद करतील, असं देखील बावनकुळे म्हणाले. अजित पवार हे खंबीर नेते असून ते महायुती सोबतच राहतील असल्याचंही बावनकुळे यावेळी म्हणाले.
संविधान व आरक्षणाच्या विरोधात अमेरिकेत जाऊन वक्तव्य करणारे काँग्रेसचे नेते व विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेचा राजीनामा द्यावा तसेच आरक्षण विरोधात वक्तव्य केल्यामुळे राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा व निषेध व्यक्त करावा भारतीय जनता पक्षाच्यावतीने व महायुतीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आज मोठ्या संख्येने काँग्रेसच्या निषेधार्थ व महाविकास आघाडीचा विरोध करण्यासाठी रस्त्यावर येणार असून विधानसभेत निवडणुकीमध्ये निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळणार असून महायुतीमध्ये मतभेद नसून जागा वाटप 70 टक्के पूर्ण झाले असून उर्वरित जागेचा वाटप येत्या दोन-तीन दिवसात पूर्ण होणार अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
स्थानिक आर एस हॉटेलमध्ये आज सकाळी आयोजित पत्रकार परिषद मध्ये ते बोलत होते. पत्रकार परिषद मध्ये खासदार अनुप धोत्रे, भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल, किशोर पाटील, जयंत मसने, विजय अग्रवाल, बळीराम सिरस्कार, गिरीश जोशी, माधव मानकर, एडवोकेट देवाशिष काकड, संजय गोटफोडे , पवन तायडे, शेलार मामा, किशोर कुचके आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
काँग्रेसने दिलेले अभिवचन कर्नाटक हिमाचल प्रदेश मध्ये पूर्ण केले नाही ज्या योजना सुरू होत्या त्या योजना बंद केल्या. महाराष्ट्रात सुद्धा महाविकास आघाडी सत्तेवर आली तर लाडकी बहीण, एक रुपया पिक विमा योजना सारखा योजना बंद केल्याशिवाय राहणार नाही. विकासासाठी महायुतीला विजयी करावे व जनता जनार्दन जात-पात धर्म पेक्षा महाराष्ट्राच्या विकासासाठी महायुतीला विजयी करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी विदर्भातील जनता जनार्दन मोठ्या संख्येने महायुतीला विजयी करेल, असा विश्वास त्यांनी आपल्या दौऱ्याच्या अनुभवाचा कथन करताना सांगितले.
राहुल गांधी देशाच्या विरोधात भूमिका घेऊन अमेरिकेत आरक्षणासंदर्भात वक्तव्य केल्यावर सुद्धा त्यावर एकही शब्द उच्चारत नाही. ममता बॅनर्जी पासून अखिलेश यादव बोलत नाही. मराठा आरक्षणासंदर्भात प्रश्न विचारल्यास मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या बाजूने भारतीय जनता पक्ष असून कोणत्याही समाजावर अन्याय न होता मराठा समाजाला आरक्षण मिळावा ही भूमिका आहे. आरक्षण देण्यासाठी महायुती कटिबद्ध असून छत्रपती शिवाजी महाराज यांना साक्षी ठेवून मराठा समाजाच्या विकासासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शब्द दिला आहे. त्यामुळे मराठा समाजाचा तसेच धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात सुद्धा न्याय मिळाला पाहिजे व त्यासाठी महायुती कधीबद्ध असून समाजातील वेगवेगळ्या घटकांच्या आरक्षणासंदर्भात एकत्रित येऊन प्रश्न सोडवण्याची गरज असल्याची ही यावेळी त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदचे प्रास्ताविक गिरीश जोशी यांनी केले.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा