- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
assembly-elections-SMF-akl: विधानसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाला 15 टक्के उमेदवारी द्यावी - ॲड. अफरोज मुल्ला यांचे विधान
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
ॲड. नीलिमा शिंगणे जगड
अकोला: सर्व पक्षीय प्रमुख नेत्यांना मुस्लिम समाजाच्या राजकीय प्रतिनिधित्वाच्या मुद्द्यावर सेक्युलरवादी मुस्लिम फ्रंटने औपचारिक पत्र पाठवले आहे, त्याबाबत सकारात्मक चर्चा सुरु आहे. या पत्रात, मुस्लिम समाजाच्या 15% जनसंख्येच्या टक्केवारीनुसार विधानसभेच्या जागांची मागणी करण्यात आलेली आहे. सेक्युलरवादी मुस्लिम फ्रंट हे सर्वपक्षीय मुस्लिम समाज प्रतिनिधींच्या एकत्रित समाज व्यासपीठ म्हणून ही मागणी स्वरूपात राज्यभर यात्रा घेवून जात असून, वाढत असलेला पाठिंबा सर्वत्र राजकीय चर्चेचा विषय झाला असल्याचे सेक्युलरवादी मुस्लिम फ्रंट नेते ॲड. मोहम्मद अफरोज मुल्ला यांनी सांगितले.
सेक्यलुरवादी मुस्लीम फ्रंटच्या वतीने आज अकोला येथील शासकिय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती. यामध्ये ॲड. मुल्ला यांनी मुस्लिम समाज राजकीय प्रतिनिधित्त्व महाराष्ट्र राज्य यात्रा बाबत भूमिका स्पष्ट केली.
अलीकडे पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाने महाविकास आघाडीला एकसंध समर्थन दिले होते, ज्यामुळे आघाडीला विजय प्राप्त झाला. तरीही, सध्याच्या परिस्थितीत मुस्लिम समाजाचे राजकीय प्रतिनिधित्व शून्यगणिक आहे. विधान परिषदेत एकही सदस्य नाही, आणि लोकसभा मतदारसंघात देखील प्रतिनिधित्व नाही. मुस्लिम समाज महाराष्ट्रातील 65 विधानसभेच्या मतदारसंघांत निर्णायक ठरतो, तरीही त्यांच्या प्रतिनिधित्वाची अवस्था चिंताजनक आहे, या समस्येवर उपाय म्हणून, सेक्युलरवादी मुस्लिम फ्रंट आगामी विधानसभा निवडणुकीसाठी एक व्यापक यात्रा सुरू केली आहे. ही यात्रा 30 ऑगस्ट 2024 रोजी शाहू स्मारक, कोल्हापूर येथून झाली यानंतर यात्रा सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, यवतमाळ, अमरावती, असा प्रवास करीत आज अकोला शहरात पोहचली. यात्रा उद्या बुलढाणा येथे पोहचणार असल्याचे ॲड. मुल्ला यांनी सांगितले.
या यात्रेद्वारे, मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधित्वाच्या मुद्द्यावर व्यापक चर्चा करण्यात येत आहे. सर्व राजकीय पक्षांना मुस्लिम समाजाच्या लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार 15% उमेदवारी देण्याची मागणी अधिक बाळकटीने समाज म्हणून महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आणण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे ॲड. मुल्ला यांनी सांगितले.
मागणीला वाढता पाठिंबा पाहता व सुरु असणाऱ्या सकारात्मक चर्चा पाहता परिणाम स्वरूप समाजाला येणाऱ्या विधानसभे मध्ये जनसंख्या टक्केवारी नुसार 15% उम्मेदवारी मिळून समाजाचे राजकीय प्रतिनिधित्व निश्चित निर्माण होईल, अशी आशा ॲड. मुल्ला यांनी व्यक्त केली.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा