- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
amt-university-youth-festival: अमरावती विद्यापीठ युवा महोत्सव:युवा महोत्सवाच्या तिसऱ्या दिवस शास्त्रीय गायन आणि नृत्य कलेचे प्रदर्शन
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोलाः संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती अंतर्गत अकोला येथील शंकरलाल खंडेलवाल कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात गेल्या तीन दिवसापासून विद्यापीठाचा छात्र तरंग युवा महोत्सव उत्साहात संपन्न होत आहे. रविवारी तिसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांनी या महोत्सवात विविध कलांचे रंग भरले.
युवा महोत्सवात तिसऱ्या दिवशी सर्वात पहिल्यांदा मैफिल सजली ती शास्त्रीय नृत्यांची. यामध्ये प्रामुख्याने कथ्थक आणि ओडिसी नृत्य सादर करण्यात आली. डॉ एच एन सिन्हा महाविद्यालय पातुर, आर एल टी महाविद्यालय अकोला, राम मेघे महाविद्यालय अमरावती, डॉ पी डी कॉलेज ऑफ एज्युकेशन अमरावती, सिपना कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अमरावती, ब्रिजलाल बियाणी महाविद्यालय अमरावती, श्री शिवाजी आर्ट्स व कॉमर्स कॉलेज अमरावती इत्यादी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शास्त्रीय नृत्य सादर केली.
नृत्य स्पर्धेमध्ये वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी लोकनृत्य आणि आदिवासी नृत्य सादर केली. यामध्ये रामराव सरनाईक महाविद्यालय वाशिम, मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालय वाशिम, सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय वाशिम , इन्नानी महाविद्यालय कारंजा, संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजीनियरिंग बुलढाणा, संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजीनियरिंग शेगाव, एसएसटी महाविद्यालय शेगाव, श्री शिवाजी महाविद्यालय चिखली, जी एस कॉलेज खामगाव या महाविद्यालयांचा समावेश होता.
लोकनृत्यामध्ये जागरण, आराधी, खंडोबा, गोंधळ व विविध आदिवासी नृत्यांचा समावेश होता. या स्पर्धेचे समन्वयक म्हणून प्रा. जयश्री सकळकडे व रोहन शिरसाट यांनी जबाबदारी सांभाळली.
युवा महोत्सवांमध्ये चिकट कला अंतर्गत 31 विद्यार्थ्यांनी विविध कोलाज काढले. यामध्ये प्रामुख्याने निसर्ग, फेस मास, ॲनिमल अशा पद्धतीचे वेगवेगळ्या प्रकारची कलाकृती विद्यार्थ्यांनी सादर केली. फोटोग्राफी अंतर्गत 38 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला तर ऑन द स्पॉट पेंटिंग मध्ये 52 विद्यार्थी सहभागी झाले.पोस्टर मेकिंग स्पर्धेमध्ये 67 विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची चित्रे काढली. या स्पर्धेमध्ये पाणी वाचवा जीवन वाचवा , आर्टिफिशियल इंटेलिजन्स, व्यसनांच्या विळख्यात तरुण या विषयावरची विविध वास्तववादी चित्रे विद्यार्थ्यांनी रेखाटली. व्यंगचित्र स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची राजकीय सामाजिक व आर्थिक विषयाशी संबंधित व्यंगचित्रे काढली. या व्यंगचित्रांमधून सध्या चालू असलेल्या विविध घडामोडींवर मार्मिक भाष्य करण्यात आले.
माती कलेअंतर्गत विविध कलाकृती, देवी देवतांच्या मुर्त्या व वेगवेगळे आकार असलेल्या मुर्त्या तयार करण्यात आल्या . यामध्ये विविध मुला मुलींनी आपले कलेचे गुण दाखविले.
वादविवाद स्पर्धेमध्ये अमरावती ग्रामीण व शहर यातील महाविद्यालयांनी सहभागी सहभाग नोंदविला. यामध्ये "परिवारो मे घटती नैतिक शिक्षाही समाज मे बढते दुष्कर्म का कारण है? या विषयावर विरोधी व संमत मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
एकांकिका स्पर्धेत बुलढाणा जिल्ह्यातील दहा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एकांकिका सादर केल्या.
यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन,व्यसनमुक्ती, स्त्री सक्षमीकरण, व्यवसाय निवडीचे स्वातंत्र्य अशा विविध विषयावर विद्यार्थ्यांनी एकांकिका सादर केल्या. या स्पर्धेचे समन्वयक प्रा डिंपल मापारी, शेखर दीक्षित होते.
मुकनाट्य व प्रहसन या दोन स्पर्धांमध्ये अमरावती शहर व ग्रामीण परिसरातील महाविद्यालयांनी विविध प्रकारच्या सामाजिक सांस्कृतिक आर्थिक व राजकीय विषयावरील एकांकिका व प्रहसन सादर केले.
भारतीय समूहगान स्पर्धेमध्ये अमरावती ग्रामीण व शहर अशा दोन्ही परिसरातील 174 महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. वकृत्व स्पर्धेमध्ये अमरावती ग्रामीण व शहर जिल्ह्यातील ३० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेचे समन्वयक डॉ. शिवाजी नागरे होते. स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी विविध विषयावर आपली मते व्यक्त केली.
विद्यार्थी विकास विभागाचे समन्वयक डॉ. राजीव बोरकर, प्राचार्य जगदीश साबू, प्रा. रसिका वाजगे, प्रा. अभय वानखडे, प्रसिद्धी समन्वयक डॉ श्रीकृष्ण काकडे, विद्यापीठ संयोजन समितीचे डॉ. सावन देशमुख, डॉ. निखिलेश नलोडे, नेत्रा मानकर, डॉ सुरज हेरे, सीमा देशमुख, महाविद्यालय समन्वयक डॉ. ज्ञानसागर भोकरे, सुमेध कावळे, डॉ. निशा वराडे, डॉ. अरुण शेळके, पियुष नाल्हे, चंद्रशेखर कडू, प्रसन्न पांडे, मिलिंद शिरभाते, विवेक माने यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी परिश्रम घेत आहेत.
आज सोमवार 30 सप्टेंबर रोजी युवा महोत्सवाचा समारोप होत असून यामध्ये प्रामुख्याने मेहंदी, रांगोळी व स्थापना म्हणजेच इन्स्टॉलेशन अशा तीन मोठ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते यांच्या अध्यक्षतेखाली समारोप संपन्न होत असून यावेळी आमदार वसंत खंडेलवाल तथा एडवोकेट गिरीश देशपांडे, प्राचार्य जगदीश उपस्थित राहणार आहेत.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा