- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
राष्ट्रीय समाज पक्षाचा वर्धापन दिन सोहळ्यात विधानसभा निवडणूकीवर झाले मंथन
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: छत्रपति शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्याच कुणीही राजकरण करू नये, असे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेवराव जानकर यांनी केले.
राष्ट्रीय समाज पक्षाच्या 21 व्या वर्धापन दिनानिमित्त महादेवराव जानकर आज अकोल्यात आले होते. कार्यक्रमानंतर प्रसार माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
आपण आपल्या 21 वर्षाच्या पक्षाच्या प्रवासात खुश असून नाराज नाही, आपण आमदार नाही तर खासदार होवू असंही जानकर म्हणाले.
या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्यासह राजस्थान , बिहार , उत्तर प्रदेश , मध्यप्रदेश , दिल्लीसह 8 राज्याचे प्रदेशाध्यक्ष आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थितीत होते.
आगामी विधानसभा स्वतंत्रपणे लढणार
यावेळी आपल्या भाषणातून त्यांनी महायुतीसोबत लोकसभेत जाण्याची चूक केली असही ते म्हणाले. मात्र मनात इच्छा नसतानाही काही गोष्टी कराव्या लागत असून काही ॲडजस्टमेंट ही कराव्या लागतात असंही जानकर म्हणाले. राज्यसभा न मिळाल्याने आपण नाराज नसून महायुतीने एक जागा दिली. त्याबद्दल आपण खुश असून, आपला पराभव झाला यात त्यांचा दोष नसल्याचाही जानकर म्हणाले. महाराष्ट्रातील 288 जागा स्वबळावर लढून कोणत्याही तिसऱ्या व चौथ्या आघाडीवर आमचा विश्वास नसून आगामी विधानसभा स्वतंत्रपणे लढणार असल्याचेही ते बोलले. अकोल्यात आयोजित एकविसाव्या वर्धापन दिनानिमित्त त्यांनी कार्यकर्त्यांना पक्ष बांधणीकडे लक्ष देवून आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
दहा आमदार निवडून द्या,राज्याचा मुख्यमंत्री रासपचा करतो
राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष हा महायुती व महाविकास आघाडी सोबत समान अंतर ठेवून राज्यातील सर्व विधानसभा मतदार संघात आपले स्वतंत्र उमेदवार उभे करणार असल्याचा निर्णय घेण्यात येत असून कार्यकर्त्यांनी निवडणूकीसाठी जोमाने तयारी सुरू करण्याचे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक, माजी मंत्री महादेवराव जानकर यांनी केले.
राष्ट्रीय समाज पक्षाचा 21 वा वर्धापन दिन सोहळा मराठा मंगल कार्यालयात गुरुवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यात राज्यातील विविध जिल्ह्यातून आलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेत सोहळ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक,माजी मंत्री महादेवराव जानकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनात संपन्न झालेल्या या वर्धापन दिन सोहळ्यात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष एस एल अक्कीसागर राष्ट्रीय संघटक गोविंदराव शूरणार,राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरेमामा,राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील पाल, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथनाना शेवते, रत्नाकर गुट्टे, पक्षाचे विदर्भ अध्यक्ष डॉ तौसीफ शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
दीप प्रजवलन व स्वागत गीताने या संमेलनास प्रारंभ करण्यात आला. यावेळी पारंपरिक तुतारी वाजवून जानकर यांचे तर सर्व मान्यवरांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.
रासप कडे अनेक रस्ते
जानकर यांनी आपल्या मार्गदर्शनात राष्ट्रीय समाज पक्षाच्या वीस वर्षाच्या कार्याचा आढावा सादर केला.
ते म्हणाले, रासप कडे अनेक रस्ते आहेत, एक भाजपचा, तर दुसरा काँग्रेसचा रस्ता आहे. मात्र आपण स्वतः पांदण तयार करून त्या पांदणाद्वारे मार्गक्रमण या राजकीय व्यवस्थेत करीत असल्याचे स्पष्ट केले.
समर्पित कार्यकर्त्यांचा तापून निघालेला हा पक्ष
रासप हा गोरगरिब, कष्टकरी,कामगिरी ,शेतकरी आदींचा पक्ष असून या वीस वर्षात पक्षाने अनेक गडांतर जवळून बघितले आहेत. समर्पित कार्यकर्त्यांचा तापून निघालेला हा पक्ष असून हा नव्या जोमाने आगामी विधानसभेच्या निवडणुकीत उतरणार असल्याचे सांगितले.
तथापि रासपची शक्ती ही मर्यादित असूनही आपण जिंकणाऱ्यांना पाडू शकतो याचे भान अन्य पक्षांनी ठेवावे असा सूचना वजा इशारा ही जानकर यांनी यावेळी दिला.
या विधानसभेत कुठल्याच पक्षाला बढत मिळणार नसली तरी कार्यकर्त्यांनी जर राष्ट्रीय समाज पक्षाचे दहा उमेदवार निवडून दिलेत तर राज्याच्या राजकीय व्यवस्थेत नवे मन्वंतर घडून येणारा मुख्यमंत्री हा रासप चा होऊन शकतो असे स्पष्ट केले. आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी अन्य पक्षाच्या नादी न लागता आपल्या पक्षाला वाढविण्याचे आवाहन केले.
प्रास्ताविक युवा आघाडीचे अध्यक्ष केशव मुळे यांनी केले. या सोहळ्याचे प्रास्तविक पक्षाचे अकोला युवक अध्यक्ष केशव मुळे यांनी करून पक्षाची रूपरेखा मांडली.
यावेळी राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील पाल, विदर्भ अध्यक्ष तौसिफ शेख, सुवर्णाताई कराड, किरण गोपने ,अचित पाटील, विष्णू गोरे,शरद बायकर, विठ्ठल यमकर, शरद धावत, प्रल्हाद पाटील, शिवाजी शेंडगे, ज्ञानेश्वर सलगर, वीरपाल, गोपाल पाठक, प्राण सिंह, धर्मांना तोफाकरे, बाळकृष्ण ठोंबरे यांच्या समवेत राष्ट्रीय व राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करीत आगामी विधानसभा निवडणुक व पक्ष संघटन संदर्भात आपली भूमिका मांडली. संचालन पक्षाचे मुख्य महासचिव ज्ञानेश्वर माऊली सलगर यांनी केले. तर आभार रासप जिल्हाध्यक्ष दादाराव ढगे यांनी मानलेत.
यावेळी विदर्भ सचिव गणेश मानकर, जिल्हा सचिव अंकुश बाळापुरे, युवक आघाडी उपजिल्हाध्यक्ष प्रवीण नंदाने, ज्येष्ठ मार्गदर्शक राजुभाऊ डोंजेकर, युवक जिल्हा संघटक उमेश मोहरकर, अकोट तालुका उपप्रमुख सुनील वानखडे, अकोला शहर प्रमुख देशमुख ताई, अकोला महिला जिल्हा प्रमुख किरणताई इंगळे, जिल्हा संघटिका मीनाताई गावंडे, जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप गावंडे, अकोला महानगर अध्यक्ष इम्रान मिर्झा, कमलबाई सुरूशे, विश्वनाथ जावरकर ,आनंदराव गोठागडे,सुभाष गावंडे, सागर धनोरीकर, प्रमोद काळे, मंगेश टोलमारे, ओम गावंडे, राधे सोळंके, संदीप उमाळे, यश सोनटक्के, शीलवंत खंडारे, मो. सोफियान, प्रवीण नंदाने, किरण धांडे, विनोद वाकोडे समवेत राज्यभरातुन आलेले सर्व जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा