- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
road-accident-highway-karnja: समृद्धी महामार्गावर उभ्या ट्रकला कारची धडक ; मुंबईच्या सोनार कुटुंबावर काळाचा घात
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
वाशिम/ अकोला : भरधाव कार उभ्या ट्रकवर धडकून झालेल्या भीषण अपघातात वडील व मुलगा जागीच ठार झाले. पत्नी व मुलगी गंभीर जखमी झाली आहे. ही घटना 15 ऑगस्ट रोजी सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास समृद्धी महामार्गावरील शेलूबाजार लोकेशन 218 वर घडली.
पराग सोनार (44) व अनुश सोनार (7, दोघेही रा.नवी मुंबई) अशी मृतांची तर पत्नी दीपाली पराग सोनार (40) व मुलगी रुजुल पराग सोनार (17) अशी गंभीर जखमींची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार , नवी मुंबई येथील सोनार कुटुंब कारने ( एम एच 43 बी के 6284) वर्धा येथे जात होते. मार्गात नादुरुस्त अवस्थेत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर ( एम एच 04 एच डी 9981) कार धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात पराग सोनार व अनुश सोनार जागीच ठार झाले. तर पत्नी दिपाली सोनार व मुलगी रुजुल सोनार ही गंभीर जखमी झाली.
दरम्यान,अपघाताची माहिती संजय इंगोले यांनी येथील श्रीगुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांना दिली. त्यामुळे जय गुरुदेव रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक अविनाश भोयर पाटील, समृद्धी लोकेशन कारंजा 108 चे डॉ.भास्कर राठोड, पायलट आतिश चव्हाण, शेलूबाजार लोकेशन 108 चे पायलट सोनू पाटील शिंदे, डॉ.आडोळे, तसेच लोकेशन मालेगाव 108 ही तत्काळ घटनास्थळी पोहचली व जखमीस ग्रामीण रुग्णालय शेलुबाजार येथे उपचारासाठी आणले. प्रथमोपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे रेफर करण्यात आले.
हा अपघात एवढा भीषण होता की पराग आणि मुलगा अनुश हे कारमध्ये अडकून पडले होते. अग्निशमन दलाने ग्राइंडरने कारचा पत्रा कापून त्यांचे मृतदेह बाहेर काढले. यावेळी हायवे पोलीस, एचएसपी टीम, महाराष्ट्र सुरक्षा रक्षक टीम, अग्निशामक दल शेलूबाजार लोकेशन टीम प्रामुख्याने हजर होती.
दरम्यान, अकोला जिल्हा वैश्य सोनार संघाला अपघाताची माहिती मिळताच सर्व पदाधिकारी सोनार कुटुंबाच्या मदतीस धावून गेले. अकोला येथे जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून काल पासून संघाचे पदाधिकारी येथे हजर आहेत.
मृतकांवर अकोला येथे अंत्यसंस्कार
श्री दीपकराव रामभाऊ चावरे वर्धा यांचे जावई श्री. पराग रविंद्र पोलस्ते (सोनार) सहपरिवार मुंबई वरुन सासरी वर्धा येथे जात असतांना, समृद्धी महामार्गावर शेलुबाजार नजीक भीषण अपघात होऊन श्री. पराग रवींद्र सोनार वय 46 व त्यांचे चिरंजीव कुमार अनिष वय 9 यांचे दि. 15 ऑगस्ट 2024 रोजी अपघातात निधन झाले . तसेच त्यांची पत्नी व मुलगी रुग्णालयात भरती आहे. त्यांचा अंत्यविधी त्यांचे साळे (शालकल श्री. प्रणव दिपक चावरे यांच्या घरून (किव्ही टॉवर निवारा कॉलनी) जानोरकर मंगल कार्यालय समोरून अकोला येथुन दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 8 वाजता निघाली. अंत्ययात्रा ही कौलखेड स्मशानभूमी येथे निघाली. यावेळी अकोल्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा