- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
घटनास्थळ
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: शहरातील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या यमुना कॉम्प्लेक्स जवळ आज घडलेल्या अपघातात एका 20 वर्षीय युवती गंभीर जखमी झाली असून तिला आपले दोन्ही पाय गमवावे लागन्याची शक्यता आहे. प्राप्त माहितीनुसार लक्ष्मी राहुल संसारे (रा. कृषी नगर) असे या मुलीचे नाव असल्याचे समजते.
सायकलवर जाणाऱ्या या मुलीला मागून येणाऱ्या टीप्परने जुन्या इन्कम टॅक्स चौककडे जाणाऱ्या रस्त्याच्या वळणावर घडक दिली. या धडकेत मुलगी सायकलवरून खाली पडली आणि ट्रकच्या चाका खाली आली. या घटनेत तिला आपले दोन्ही पाय गमवावे लागले.
या घटनेला अप्रत्यक्षरीते महापालिका प्रशासन आणि पोलीस विभाग जवाबदार असल्याचं नागरिकांनी याप्रसंगी आरोप केला.
या वळणावर बांधण्यात आलेला नाल्यावरील ब्रीज हा निकृष्ट दर्ज्याचा बांधण्यात आला असून त्यात खड्डा सुद्धा पडला आहे. यामुळे दररोज किरकोळ अपघात या ठिकाणी होतात.
त्याचप्रमाणे येथील चहा दुकानांमुळे मोठी गर्दी होत असून दुचाकी - चारचाकी थेट रस्त्यावर उभ्या असतात. मात्र टॉइंग पथक या मार्गावर कधी कारवाई करतांना दिसत नाही.थोडी फार दुरुस्ती केल्यास या ठिकाणी होणारे रोजचे अपघात टाळता येईल अशी अपेक्षा यावेळी नागरिकांनी व्यक्त केली.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा