- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
ramprakash-mishra-assault case: रामप्रकाश मिश्रा प्राणघातक हल्ला प्रकरण: हल्लेखोर सी सी टी व्ही कॅमेरात कैद; हल्लेखोरांची माहिती देणाऱ्यास मिळणार योग्य बक्षीस
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: व्यवसायिक तथा भाजप व विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी रामप्रकाश मिश्रा यांच्यावर शुक्रवार रात्री पावणे अकराच्या सुमारास प्राणघातक हल्ला झाला. ही घटना खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. प्राणघातक हल्ला करणाऱ्या दोन अनोळखी इसमांची माहिती देणाऱ्यास पोलीस विभागातर्फे योग्य बक्षीस देण्यात येणार आहे. दोन अनोळखी हमलेखोर सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाले असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.
अशी घडली घटना
अकोला शहरातील पोलीस स्टेशन खदान अकोला येथे फिर्यादी राहुल मनोहरराव घोडे (वय ३५ वर्ष धंदा- वाहन चालक, रा. रेणुका नगर, डाबकी रोड अकोला) यांनी 31ऑगस्ट 2024 चे रात्री दरम्यान या घटनेची तक्रार पोलीस स्टेशनला नोंदविली.
घोडे हे रामप्रकाश बन्सलोचन मिश्रा (वय 55 वर्ष रा. साई ईगल अपार्टमेंट, माधवनगर अकोला) यांना नागपुर एअरपोर्ट येथुन घेवून त्यांचे वाहन क्रमांक एमएच-30-एएच-1001 (फोरच्युनर) ने 30 ऑगस्टचे रात्री अंदाजे 22.15 वाजता आले. घराजवळ दोघेही वाहनातुन खाली उतरले. मिश्रा हे पार्किंगचे गेट उघडत असताना, त्यादरम्यान तोंडाला मास्क लावलेला एक इसम तेथे आला. काही कळण्याच्या आत त्या मास्कधारी इसमाने चाकुने रामप्रकाश बन्सलोचन मिश्रा यांचेवर प्राणघातक वार केले. हमला करीत असतांना हल्लाखोर आणि मिश्रा यांच्यात झटापट होत असतांना वाहन चालक घोडे त्यांचे जवळ गेले असता, हमला करणारा इसम पळुन गेला व थोडयाच अंतरावर एक काळया रंगाची पल्सर मोटार सायकल घेवून उभ्या असलेल्या इसमाचे विना नंबर प्लेटच्या गाडीवर बसुन, जयभोले किराणा शॉपकडे पळुन गेले.
पळुन गेलेल्या इसमांचे वर्णन
वय अंदाजे 35 ते 40 वर्ष वयोगटातील असुन, दोघांचेही तोंडाला मास्क लावलेले होते. अंगात फुलपॅन्ट व फुल बाहयाचे शर्ट, दोघांचे पायात स्पोर्ट शुज, एकाच्या डोक्यात कॅप असलेला अशा वर्णनाच्या दोन अनओळखी इसमा विरूध्द पो.स्टे. ला अप.नं. 628/2024 कलम 109, 3(5) बिएनएस प्रमाणे गुन्हां नोंद करण्यात आला आहे.
माहिती देणाऱ्यास बक्षीस
अशा वर्णनाचे इसम मिळुन आल्यास पो.स्टे. खदान अकोला तसेंच स्थानिक गुन्हें शाखा अकोला किंवा नजिकच्या पोलीस स्टेशनला खालील मोबाईल नंबरवर माहिती देण्यात यावी, माहिती देणा-याचे नांव गुप्त ठेवण्यात येईल तसेंच योग्य ते बक्षीस देण्यात येईल.
संपर्क
पोलीस निरीक्षक किशोर शेळके, ठाणेदार पो.स्टे. खदान, अकोला (मो.नं. ९४२२९५८६१५.) फोन नं. ०७२४- २४२३३२.
अथवा
पोलीस निरीक्षक शंकर शेळके, स्थानिक गुन्हें शाखा, अकोला (मो.नं. ९९२१०३८१११.) यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन केले आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा